Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
क्राईमशिर्डी

सावळीविहीर ग्रामपंचायतचा कारभार म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय

शिर्डीः राहाता तालुक्यातील सावळीविहीर

sai nirman
जाहिरात

ग्रामपंचायत समोरच असलेल्या स्वच्छता गृहाची अतिशय दयनिय अवस्था झाल्याने ग्रामपंचायत चा कारभार म्हणजे आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

DN SPORTS

kamlakar

तालुक्यात सर्वात मोठी सात हजार लोकसंख्या असलेलं हे गाव असून आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या शिर्डी पासून अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर हे गाव नगर- मनमाड महामार्गावर वसलेले आहे. शिर्डीचे नाक म्हणून या गावाची ओळख आहे.

येथुनच देश विदेशातील साईभक्त, राजकारणी लोकांचा राबता या ठिकाणी नेहमी असतो. येथील ग्रामपंचायत ची इमारत अगदी महामार्गालगत असुन बाजार तळाच्या जागेत

वसलेली आहे.

ग्रामपंचायत चे अगदी दर्शनी भागात शौचालय व स्त्री पुरुष स्वच्छतागृह उभारले आहे. गुरुवार हा येथील आठवडे बाजार असल्याने रुई, कोहकी, शिंगवे, शिर्डी, सोनेवाडी, कोकमठाण, कारवाडी आदी पंचक्रोशीतील नागरिक येथे मोठ्या संख्येने बाजारला गर्दी करतात, या ठिकाणी माजी सरपंच रुपालीताई संतोष आगलावे यांनी ग्रामस्थांची व बाजार करूंची सोय व्हावी या उदात्त हेतूने सदर स्वच्छतागृह उभारले आहे.

परंतू याची इतकी दुरावस्था झाली आहे की, या ठिकाणाहून नाक मुठीत धरून जावे लागते. स्वच्छता गृहात डोकावले तर मुताऱ्या तुबलेल्या, शौचालय भांड्यात दारूच्या बाटल्या, विष्ठा, अगदी गच्च भरलेले. आतमध्ये तर प्रवेश करने तर सोडाच पण येथून जाताना मोठ्या मुश्कीलीने

कामे जमत नसेल तर खुर्चा खाली करा

गावाने मोठ्या विश्वासाने सरपंच पद निवडून दिलेले असते व ग्रामसेवकाने प्रत्येक ग्रामस्थांना गावचा विकास करणे व आपले गाव इतर गावापेक्षा सुंदर कसे दिसेल याचा प्रयत्न करने गरजेचे असताना महिलांच्या स्वच्छतागृहा बाबत दोघे संवेदनशील नाही. येथील स्वच्छतागृह पाहून त्यांचे घरचे असेच असतील का हे बघावे लागेल. जर तुमचे कडून कामे होत नसेल तर खुर्ची खाली करा असा सल्ला येथील गृहिणी सौ. अनुराधा वाघमारे यांनी दिला आहे.

अनुराधा वाघमारे, गृहीणी

प्रामुख्याने महिलांना मोठा त्रास होतो. येथे ग्रामसेवक, सरपंच व इतर पदाधिकारी येथून वावरत असताना त्यांचे साधे लक्ष ही याकडे जात नाही हे दुर्भाग्य म्हणावे लागेल.

शासनाने महिला भगिनींची कुचंबणा थांबावी, म्हणून केलेला हा निधी खर्च ग्रामपंचायतच्या या भोंगळ कारभारामुळे वाया गेला आहे.

गाव विकसीत व्हावे तसेच इतर मतदार संघात आपल्या मतदार संघाचा आदर्श घ्यावा म्हणून ना. राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय विखे हे प्रयत्नशील असून गावात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत असतात. सरपंच, ग्रामसेवक ग्रामस्थांची अशी कुचंबणा करत असल्याने परिणामी विधान सभेच्या निवडणूकीत मतदान कमी पडते. त्यामुळे ना विखे यांचे आदेशालाच तिलांजली देण्याचे काम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button