Letest News
गजर भक्तीचा.. साई हरी नामाचा ५३ वा सार्वजनिक कीर्तन सोहळा उत्साहात! खग्रास चंद्रग्रहणामुळे ३ मार्च रोजी शिर्डीत दर्शन व्यवस्था तात्पुरती बंद साई रामनवमी उत्सव २०२६ (वर्ष ११५ वे) : नियोजनासाठी महत्वाची बैठक shirdinews-10 मार्चला 101 घरांवर कारवाई लक्ष्मीनगरमध्ये तणावपूर्ण शांतता मध्यरात्री श्री सुमतीनाथ जैन मंदिर येथे दरोड्याचा थरार-अंगरक्षकाच्या धाडसाने कट उधळला श्रद्धा, सबुरी आणि शस्त्रकौशल्याचा चमत्कार! श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये ४ किलोचा ट्यूमर यशस्वीरीत्या... दत्तनगर जवळ ‘सोरट’ जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा चौघे जेरबंद वर्दीत रील्स करणाऱ्या पोलिसांवर मुंबई पोलीस प्रशासनाचा कडक इशारा रमजान महिन्याची पवित्र सुरुवात-राहाता–शिर्डी बाजारपेठेत उसळली उत्साहाची लाट तोंडावाटे धूर ओढत-नाकावाटे सोडत गांजा सेवन-शिर्डीत चार तरुण गजाआड!
राजकीयशिर्डी

गजर भक्तीचा.. साई हरी नामाचा ५३ वा सार्वजनिक कीर्तन सोहळा उत्साहात!

शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा रमावर…”
या साई–विठ्ठल भक्तीच्या ओवीने पुन्हा एकदा शिर्डी नगरीत भक्तिरसाचा दरवळ पसरविणार आहे.
॥ रामकृष्ण हरी ॥ ॥ रामकृष्ण हरी ॥
दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला सद्गुरू साईबाबा यांच्या पावन आशीर्वादाने आणि ह.भ.प. काशिकानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ५३ वा सार्वजनिक कीर्तन सोहळा येत्या शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री ९.०० या वेळेत संपन्न होणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या कीर्तन सोहळ्यात प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अरुण महाराज दिघे (सोनी TV मराठी फेम) आपल्या ओजस्वी, भारदस्त आणि हृदयस्पर्शी वाणीतून साईनाम व विठ्ठलनामाचा गजर घडवणार आहेत. त्यांच्या कीर्तनातून भक्ती, अध्यात्म आणि समाजप्रबोधन यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे.


कीर्तनाचे ठिकाण — साई निर्माण करिअर अॅकॅडमी ग्राऊंड, श्रीकृष्णनगर, शिर्डी येथे आहे. कीर्तनानंतर भाविकांसाठी खिचडी प्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
या भक्तिमय सोहळ्याचा लाभ परिसरातील सर्व साई व विठ्ठल

घ्यावा, असे आवाहन स्वागतोत्सुक श्री विजय तुळशीराम कोते (पा. शिर्डी ग्रामस्थ, साईभक्त) यांनी केले आहे.
शिर्डी नगरीत पुन्हा एकदा साईनामाचा गजर घुमणार असून भक्तीभाव, नामस्मरण आणि सामूहिक एकात्मतेचा दिव्य सोहळा अनुभवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
॥ रामकृष्ण हरी ॥ ॥ साई राम ॥

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button