Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
अ.नगरक्राईम

दैनिक साई दर्शनच्या पाठपुराव्याला मोठे यश-राहाता पोलिसांना सन्मान नव्हे- DGP चौकशीचे आदेश!

शिर्डी / राहाता प्रतिनिधी :
शिर्डी नजीकच्या राहाता शहरात सुरू असलेली गुन्हेगारी, अवैध धंदे आणि पोलीस–गुन्हेगार संगनमताबाबत सादर करण्यात आलेल्या गंभीर, सविस्तर आणि आरोपांनी भरलेल्या अर्जाची अखेर महाराष्ट्र पोलिस महासंचालकांनी (DGP) अधिकृत दखल घेतली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


हा अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्थानिक राहाता पोलीस स्टेशनकडे न पाठवता, थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी करण्यात आली होती. त्यानुसार DGP कार्यालयाने तक्रार CP नाशिक (आयुक्त, नाशिक परिक्षेत्र) यांच्याकडे पाठवून योग्य ती चौकशी व आवश्यक कारवाईचे निर्देश दिले आहेत.


⚠️ FIR नाकारली, खुनाला वाट मोकळी!
अर्जात नमूद केल्यानुसार, दीपक पोकळे याने सचिन गिधे याचे अपहरण केल्यानंतरही पीडितेच्या पत्नीने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
मात्र अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी जाणीवपूर्वक नकार दिला आणि केवळ ‘मिसिंग’ नोंद करून गुन्हेगाराला खून करण्यासाठी मोकळा रस्ता करून दिला, असा थेट आरोप करण्यात आला आहे.


👉 वेळेत FIR झाली असती, तर आज सचिन गिधे जिवंत असता
हा आरोप म्हणजे पोलीस यंत्रणेवर बसलेली गंभीर चपराक मानली जात आहे.
💰 अवैध साम्राज्य पोलीस संरक्षणाखाली?
राहाता शहरात
▪ बिंगो जुगार
▪ मटका
▪ गुटखा विक्री
▪ पत्त्यांचे क्लब
▪ वाळू तस्करी
हे सर्व अवैध धंदे कोणतीही भीती न बाळगता सुरू असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

दीपक पोकळे व बंटी लहामगे यांच्याकडे १० डंपर वाळूचा अवैध व्यवसाय असून, त्याच काळ्या पैशावर गुंडगिरी, दहशत व गंभीर गुन्हे घडवले जात असल्याचा आरोप आहे.


🧂 “झाडाखाली सापडला” गुटखा… पुरावे नष्ट?
कानकुरी येथील गुटखा प्रकरणात पोलीस ठाण्यात आणलेला साठा ‘झाडाखाली सापडला’ असा बनाव करून आरोपीस सोडण्यात आल्याचा धक्कादायक आरोप अर्जात करण्यात आला आहे.
हा प्रकार म्हणजे गुन्हेगाराला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट केल्याचा उघड प्रयत्न, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांत उमटत आहे.


🚨 DGP हस्तक्षेपामुळे पोलीस खात्यात खळबळ
थेट पोलिस महासंचालकांनी अर्जाची दखल घेतल्यामुळे
👉 राहाता पोलीस स्टेशन
👉 संबंधित अधिकारी
👉 गुन्हेगारांना संरक्षण देणारे घटक
यांच्या अडचणी वाढल्या असून,
▪ विभागीय चौकशी
▪ निलंबन
▪ SIT मार्फत तपास
होणार का, याकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
✊ “हा केवळ खून नव्हे, तर व्यवस्थेचा खून आहे”
🕊️ सचिन गिधे यांना न्याय मिळायलाच हवा!

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button