Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
क्राईमशिर्डी

शिर्डीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा हातोडा-विकी मिसरच्या अड्ड्यावर पहाटेच धाड

शिर्डी | प्रतिनिधी
साईबाबांच्या पवित्र शिर्डीत अवैध दारूविक्रीचा धंदा फोफावत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून शिर्डी शहर पोलिसांनी पिंपळवाडी रोड परिसरातील हॉटेल न्यू सनराज येथे पहाटे छापा टाकून अवैध मद्यविक्री करणाऱ्या विकी मिसर याला रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार 15 जून रोजी पहाटे पोलिसांचे पथक थेट हॉटेल न्यू सनराज येथे धडकले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तपासणीदरम्यान विविध कंपन्यांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या, बिअरचे टिन आणि इतर मद्यसाठा आढळून आला. जप्त मुद्देमालाची किंमत 15 हजार 224 रुपये इतकी आहे.
विशेष म्हणजे आरोपीकडे मद्यविक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे धार्मिक नगरीत खुलेआम सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डीत दररोज लाखो साईभक्त येत असताना काहीजण पैशांच्या हव्यासापोटी शहराची प्रतिमा मलीन करण्याचे काम करत आहेत. अशा अवैध व्यवसायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी अशा धंदेवाल्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवांत जाधव, सागर काळे, राठोड व शिर्डी शहर पोलिसांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

छे दारूबंदी फक्त कागदावरच?
साईबाबांच्या शिर्डीत 1985 साली ग्रामसभेच्या ठरावाद्वारे कायमस्वरूपी दारूबंदी लागू करण्यात आली होती. साईबाबांच्या विचारांना अनुसरून व्यसनमुक्त आणि पवित्र वातावरण राखण्याचा त्यामागील उद्देश होता. मात्र आज वास्तव चित्र वेगळेच दिसत आहे. शहरातील विविध भागांमध्ये अवैधरित्या मद्यविक्री होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.
पोलिसांकडून अधूनमधून कारवाया होत असल्या तरी अवैध दारूविक्रीचे जाळे पूर्णपणे मोडीत निघालेले दिसत नाही. त्यामुळे “शिर्डीतील दारूबंदी केवळ कागदावरच उरली आहे का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. साईनगरीची पवित्रता अबाधित राखण्यासाठी अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर सातत्याने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button