Letest News
शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ
अ.नगरराजकीय

मुस्लिम समुदायाला पहिल्यांदाच सांगतोय, पंतप्रधान मोदी

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांच्या प्रचारात मुस्लिम आरक्षण हा कळीचा मुद्दा बनला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींसह वेगवेगळे राष्ट्रीय नेते यावर आपापल्या भूमिका मांडत आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये यावरून वादही चालू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समुदायाला संदेश दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी मुस्लिम आरक्षणावर सविस्तर भूमिका मांडली. मोदी म्हणाले, संविधान सभेत देशातील अनेक विचारवंत आणि मान्यवर बसले होते.

kamlakar

तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपाचा एकही सदस्य नव्हता. तिथे सर्व पंथांचे लोक उपस्थित होते. या सर्व लोकांनी प्रदीर्घ चर्चा करून निर्णय घेतला की, भारतासारख्या देशात धर्माच्या आधारावर आरक्षण दिल्यास देशाचं खूप नुकसान होईल. त्याचवेळी त्यांनी समाजातील अस्पृश्यता, जातीवर आधारित भेदभाव आणि अशाच विकृती दूर करण्यासाठी दलितांना, आदिवासांनी आरक्षण दिलं पाहिजे असा निर्णय घेतला.नरेंद्र मोदी म्हणाले,

“केवळ दलित आणि आदिवासींना आरक्षण देणं म्हणजे मुस्लिम समुदायाला कुठलाही लाभ मिळणार नाही असं नाही. आमच्या भाजपा सरकारने सामान्य जातींना १० टक्के आरक्षण दिलं आहे. त्यामध्ये मुस्लिम समुदायातील गरीबदेखील समाविष्ट आहे. तेदेखील सरकारी योजनांचे वाटेकरी आहेत. आम्ही कोणाचेही अधिकार हिरावत नाही आहोत.

आम्ही केवळ आरक्षणासाठी धर्माचा आधार घेण्यास विरोध करत आहोत. या देशातील गरीब व्यक्ती जी हिंदू असेल, मुस्लिम, ख्रिस्ती किंवा पारसी यापैकी कुठल्याही धर्माची असली तरी त्यांना सर्व फायदे मिळतील.” टाईन्म नाऊला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी मुस्लिम समुदाय, त्यांचं आरक्षण, मुस्लिम मतदारांबाबत रोखठोक भूमिका मांडली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button