Letest News
मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड राहता येथे बुलडोझर- मग वाळकीतील आरोपीबाबत काय? नागरिकांचा सवाल अब्दुल बाबा दरगाह साई संस्थानच्या ताब्यात घ्या हिंदू जनआक्रोश मोर्चात सागर बेग यांचा एल्गार गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या...
Blog

कोल्हार येथील न्यू प्रसाद हॉटेल जवळ वेश्या व्यवसाय कारणणाऱ्या ला पोलीसांनी घेतले ताब्यात

कोल्हार खुर्द परिसरातील हॉटेल न्यू प्रसादजवळ असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर राहुरी पोलिसांनी छापा टाकून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. दोन परप्रांतीय महिलांची सुटका केली. या परिसरात यापूर्वी देखील वेश्या व्यवसायावर पोलिस कारवाईच्या घटना घडल्या असल्याने या अनैतिक व्यवसायाला पाठबळ कुणाचे? हा सवाल वादाचा ठरला आहे.

sai nirman
जाहिरात

सायंकाळी पोलिस पथकाने राहुरी फॅक्टरी येथील एका तरुणाला बनावट ग्राहक बनवून सदर ठिकाणी पाठवले. हॉटेल जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम व एक ३१ वर्षीय व एक ३६ वर्षीय अशा दोन पश्चिम बंगाल येथील दोन महिला होत्या. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्या इसमाबरोबर सौदा ठरल्यानंतर बनावट ग्राहक असलेल्या तरुणाने पोलिसांच्या मोबाईलवर संपर्क करताच पोलिस पथकाने तत्काळ छापा टाकला.

या कारवाईत बगाराम गुमनाराम चौधरी, वय ३९, रा. बुडतला, ता. सिव, जि. बाडमेर, (राजस्थान) याला ताब्यात घेतले. दोन पर प्रांतीय महिलांची सुटका केली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे, हवालदार सतीश आवारे, देविदास कोकाटे, चालक जालिंदर साखरे, महिला पोलिस कर्मचारी शालिनी सोळसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

DN SPORTS

याप्रकरणी आरोपी बगाराम गुमनाराम चौधरी याच्या विरोधात स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापार अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. राहुरी ते कोल्हार खुर्द हद्दीत वेश्याव्यवसाय तसेच हॉटेल व धाब्यावर विना परवाना दारू विक्रीच्या घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. पोलिस कारवाई करून देखील हे अवैध व अनैतिक धंदे खुलेआम सुरू असल्याने या धंद्याला पाठबळ कुणाचे? असा सवाल नागिरकांतून होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button