Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरशिर्डी

श्री साईनाथ नेत्रपेढीचा लोकार्पण सोहळा संपन्न

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या साईनाथ नेत्रपेढीचा लोकार्पण सोहळा दि १३ मार्च २०२५ रोजी संस्थांनच्या श्री साईनाथ रुग्णालय (२०० रूम) येथे देणगीदार साई भक्त डॉ.कोंडा संगीता रेड्डी यांच्या हस्ते व श्री साईबाबा संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर साहेब भा.प्र.से व संस्‍थानचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

संस्थांनच्या रुग्णालयात श्री साईबाबांच्या नावे नेत्रपेढी सुरू व्हावी याकरिता संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले होते आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून महाराष्ट्र शासनाने नेत्र पिढी सुरू करण्यासंबंधीच्या सर्व मान्यता संस्थांन रुग्णालयाला प्रदान केल्या आहेत.


या नेत्रपेढीच्या माध्यमातून अनेक दृष्टीहीनांना दृष्टी प्राप्त होणार असुन त्याचबरोबर मृत्यूनंतर नेत्रदान करणाऱ्या जवळची सोय शिर्डी येथे निर्माण झाली आहे त्‍यामुळे याचा लाभ शिर्डी व शिर्डी येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या गरजवंत रुग्णांना होणार असुन त्‍यामुळे त्‍यांच्‍या जिवनाला श्री साईबाबांचे अशिर्वादाने कलाटणी भेटणार आहे.

येथील सर्व कर्मचारी यांनी श्री साईबाबांचा रुग्‍ण्‍सेवेचा वसा मोठया भक्‍तीभावाने जपला आहे. येथील कर्मचारी यांचे काम पाहुन मी भारावुन गेलेले आहे. असे प्रतिपादन उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी बोलताना देणगीदार साईभक्‍त डॉ.कोंडा संगिता रेडडी यांनी केले.


मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी देणगीदार साईभक्‍त यांचे आभार माणुन त्‍यांचा याप्रसंगी श्रींची मुर्ती व शॉल देवुन सत्‍कार केला आपल्‍या सारख्‍यांच देणगीदारांच्‍या कृपाशिर्वादानेच आम्‍ही श्री साईबाबांचा रुग्‍णसेवेचा वसा सुरु ठेवला आहे.
यावेळी उप वैद्यकीय संचालक, डॉ.प्रितम वडगावे, प्र.उप वैद्यकीय अधिक्षक,

डॉ.मैथिली पितांबरे, डॉ.पदमा , डॉ.अजित पाटील,डॉ.सौदामिनी निघुते, डॉ.अनघा विखे, डॉ योगेश गेठे, डॉ.अशोक गावित्रे, डॉ उज्ज्वला काळे, डॉ मधुरा जोशी,जनसंपर्क अधिकारी श्री सुरेश टोलमारे, प्र.अधिसेविका नजमा सय्यद व इतर कर्मचारी उपस्‍थीत होते.


कार्यक्रमाचं सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वै. अधिक्षिका डॉ.मैथिली पितांबरे यांनी केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button