Letest News
गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या... "गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी आरशात पाहावं" शिर्डीतून नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात वेट एन जॉयचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! १७ लाखांचे सोने आठ दिवस दडवले-व्यवस्थापन झोपेत होते की मिलीभग... अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त 
अ.नगरशिर्डी

sai mandir datta jayanti news:-साई संस्थांनच्या वतीने दत्त जयंती निमित्ताने लेंडी बागेतील श्री दत्त मंदिरात अभिषेक पूजा, तसेच दत्त जन्मोत्सव, कीर्तन कार्यक्रम संपन्न!

शिर्डी( प्रतिनिधी) श्री साईबाबा संस्थानच्या वतीने लेंडी बागेसमोरील दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्ताने धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
श्री दत्‍तजयंती निमित्‍त लेंडीबागेतील श्री दत्‍त मंदिरात श्रीदत्‍त मुर्तीवर व पादुकांवर प्रभारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर व सौ. वर्षा कोळेकर यांच्‍या हस्‍ते अभिषेक पुजा व श्रीदत्‍तात्रयांची आरती करण्‍यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी प्र. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदीर पुजारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त उपस्थित होते.
श्री.दत्‍तजयंती निमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात ह.भ.प. ज्ञानेश्‍वरी रत्‍नपारखे, बीड यांचा श्री दत्‍त जन्‍मोत्‍सव कीर्तन कार्यक्रम संपन्‍न झाला. त्‍यानंतर प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर व सौ. वर्षा कोळेकर, प्र. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले तसेच मंदीर पर्यवेक्षक राजेंद्र पवार, मंदीर पुजारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त यांच्‍या उपस्थितीत श्री दत्‍त जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला.


श्री दत्‍त जयंती निमित्‍त श्री साईबाबा मंदीर, दत्‍त मंदीर व मंदीर परीसरात देणगीदार साईभक्‍त श्रीमती रजनी डांग यांच्‍या देणगीतुन फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली होती.
श्री.दत्त जयंतीच्या निमित्ताने येथे अनेक साई पालखी व साई पदयात्री मोठ्या संख्येने आले होते.

त्याचप्रमाणे विविध वाहनातूनही साईभक्त मोठ्या संख्येने साई दर्शनासाठी आले होते. श्री साईबाबा मंदिरात तसेच इतर मंदिरात त्याचप्रमाणे लेंडी बागेतील श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती. आकर्षक विद्युत रोशनाई मंदिर व परिसरात करण्यात आली होती.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button