Letest News
गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी शिर्डीत भक्तीचा महासागर-लाखो साईभक्तांनी घेतले समाधीचे दर्शन अढळ श्रद्धेचा सुवर्णमुकुट! आंध्रच्या साईभक्ताकडून श्री साईबाबांच्या चरणी ८२.३९ लाखांचा सुवर्ण मुकुट ... साईचरणी नतमस्तक झाले अभिनेते सोनू सूद-गुरुपौर्णिमेनिमित्त घेतले समाधीचे दर्शन गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर ११३ साईभक्तांचे महादान रक्तदानातून मानवतेची खरी सेवा परवाना की गैरवापर? माजी उपसरपंचांशी संबंधित असल्याची चर्चा असलेल्या क्लबवर पोलिसांची कारवाई शिर्डीजवळील रिंगरोडवर बाभळीच्या झाडाला गळफास-बुलढाण्यातील ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या-परिसरात खळबळ साईभक्ताच्या प्रामाणिकपणाला सलाम! १५४१० ची हरवलेली पर्स मालकाला सुखरूप परत रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिसांची मोठी कामगिरी चेन स्नॅचिंग टोळ्या जेरबंद "तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?"रोहित पवारांचा सरकारवर हल्... जबलपूरच्या साईभक्ताकडून ६.२८ लाखांचा सुवर्ण मुकुट तर वडोदऱ्याच्या भक्ताकडून ३.३४ लाखांचे सुवर्ण 'ॐ' ...
अ.नगरशिर्डी

शिर्डीत श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त क्रांती युवक मंडळाची 125 किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याची अनोखी स्पर्धा!!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीत हनुमान जन्मोत्सवानिमित्त ‘क्रांती युवक मंडळा’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तरुणाईने आपल्या शक्तीचा आणि उत्साहाचा अनोखा संगम साधला. १२५ किलो वजनाचा ‘बजरंग गोटा’ उचलण्याच्याया पारंपरिक स्पर्धेत तरुणांनी जोरदार सहभाग नोंदवला. उपस्थितांनी ही मोठी दाद या स्पर्धेला दिली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात ‘क्रांती युवक मंडळ’ गेल्या २८ वर्षापासून हनुमान जन्मोत्सव साजरा करत आहे. यंदा ‘बजरंग गोटा’ उचलण्याच्या स्पर्धेत ७० हून अधिक तरुणांनी सहभाग घेतला. विधिवत पूजन शिर्डीतील वंदे मातरम संघटनेचे रमेश शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते पार पडला. या स्पर्धेत २३ जणांनी १२५ किलोचा ‘बजरंग गोटा’ लीलया उचलून दाखवला. या तरुणाईच्या उत्साहाला आणि जोशाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.


पारंपरिक व्यायाम असलेल्या जोर स्पर्धेने जुन्या आठवणींना उजाळा दिला. तरुणाई जिमच्या जमान्यात पारंपरिक व्यायामाचे महत्त्व विसरली आहे, हे लक्षात घेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. ही बक्षिसे रवींद्र कोते, अजित पारख, बापू काळे, राहुल गोदकर व प्रतीक शेळके यांच्या हस्ते देण्यात आली.

सायंकाळी चांदीच्या गदेची पूजा झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटपकरण्यात आले. मंडळाचे कार्यकर्ते सुरेंद्र महाले, सचिन तांबे, विशाल कोळपकर, विराट पुरोहित, महेश वैद्य, संतोष तांबे, आकाश त्रिपाठी, ललित शेळके, बबलू वरपे, जतीन जैन, आतिक पठाण, योगेश मोटवानी, रितेश भालेराव, संदेश रत्नपारखी, आकाश वाडेकर, शुभम ताम्हाणे, सागर परदेशी, शुभम नाणेकर, किरण परदेशी, राहुल हजारे, आर्यन्तेजी आणि आदित्य वारुळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

साई भक्त व मोठ्या संख्येने प्रेक्षक एवढी उपस्थित होते. साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी येथे दक्षिण मुखी प्रसिद्ध असे हनुमान मंदिर असून या मंदिरात बजरंग गोटा उचलण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. जिमच्या जमान्यात तरुणाईने पारंपरिक व्यायामाच्या ‘जोर’ स्पर्धेला दिलेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता. पुढील वर्षी या स्पर्धेत अधिक तरुण सहभागी होतील,

अशी आशा आहे.व तरुणांनी व्यायामाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचेही आवाहन
साई संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button