Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
अ.नगरराजकीय

शिर्डीत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत प्रहारच्या बच्चू कडूंना पाठिंबा! आणखी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा- अमोल बानाईत

शिर्डी ( प्रतिनिधी) शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, दिव्यांगांना महिन्याला सहा हजार रुपये मिळावेत .आदी मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांनी उपोषण सुरू केले आहे.याच आंदोलनाला समर्थन म्हणून शिर्डी शहरात प्रहारच्या वतीने शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिर्डी नगरपंचायत जवळील पाण्याचे टाकीवर चढून प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल बानाईत, युवक तालुका अध्यक्ष विजय काकडे ,शिर्डी शहर अध्यक्ष विकी मिसाळ आणि कार्यकर्त्यांनी शोले स्टाईल आंदोलन करत यावेळेस सरकारने तात्काळ बच्चुभाऊ कडू यांच्या मागण्यांची दखल घ्यावी. अन्यथा राज्यभर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला.

शेतकरी, दिव्यांग, अपंग यांचे दैवत श्री बच्चुभाऊ कडू गेल्या पाच दिवसापासून अमरावती या ठिकाणी उपोषणास बसलेले आहे. महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना मिळाला पाहिजे. हे मुद्दे घेऊन बच्चुभाऊ कडू गेल्या पाच दिवसापासून उपोषण करत आहे.

ते आंदोलन जेथे करत आहेत त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र मधून अनेक आमदार आणि अनेक पक्षातील खासदार अनेक लोकांचा बच्चू कडू यांना भेटून पाठिंबा देत आहेत . आश्वासन देऊनही शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही. शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे आणि त्यांचं मत खोटे बोलून सरकारने घेतलेला आहे.

चुकीच्या पद्धतीने दडपशाही पद्धतीने हे सरकार स्थापन केलेलं आहे . असे सांगत लवकरात लवकर सरकारने या ठिकाणी बच्चुभाऊ कडू यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी व त्यांच्या जीविताला काही कमी जास्त झालं तर 13 तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात अनोख्या आणि मोठ्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन उभारण्यात येईल.

असा इशारा देत सरकारला जाग येण्यासाठी आज आम्ही शिर्डी नगरपंचायत च्या पाण्याच्या टाकीवर चढून या ठिकाणी आंदोलन केलेले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात लवकरात लवकर जर निर्णय घेतला नाही तर यापेक्षाही देखील मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन करण्यात येईल, सगळ्यांचा नाद करा पण शेतकऱ्याचा नाद करू नका. असा इशाराही अमोल बानाईत यांनी दिला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button