Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरक्राईम

फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर

नाशिक पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या प्रकरणात नाशिकरोड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश केदार कोळंबकर यांनी हा महत्त्वपूर्ण आदेश देताना एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तसेच तितक्याच रकमेच्या एक जामीनदाराच्या अटीवर दिलासा दिला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


न्यायालयाने जामीन मंजूर करताना संबंधित आरोपीने तपास यंत्रणेस संपूर्ण सहकार्य करावे, चौकशीसाठी हजर राहावे तसेच तपासात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करू नये, अशा अटी घातल्या आहेत.
दरम्यान, सिन्नर प्रकरणात न्यायालयाकडून दिलासा मिळाला असला तरी शिर्डी येथे दाखल असलेल्या कथित फसवणूक प्रकरणात अद्याप न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित प्रकरणात जामीनाबाबतची प्रक्रिया प्रलंबित असल्याने या प्रकरणाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.


कायदेतज्ज्ञांच्या मते, एका प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने इतर प्रकरणांमध्ये आपोआप दिलासा मिळत नाही. प्रत्येक गुन्ह्याचा स्वतंत्रपणे विचार करून न्यायालय निर्णय देत असते.
यामुळे सिन्नर प्रकरणात दिलासा मिळाल्यानंतर आता शिर्डीतील प्रकरणात पुढे काय घडते, याकडे नागरिकांसह संबंधित यंत्रणांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button