Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
क्राईमशिर्डी

दिव्यांगावर दहशत! मारहाण-शिवीगाळ-मोबाईलची तोडफोड- सचिन भैरवकर आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल

शिर्डी | प्रतिनिधी
मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना शिर्डी परिसरातील सावलीविहीर उघडकीस आली आहे. केवळ रस्त्याच्या कडेला लघुशंका केल्याच्या कारणावरून ४५ टक्के दिव्यांग असलेल्या मजुराला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्याचा मोबाईल फोडण्यात आला. अपंग असल्याचे स्पष्टपणे माहिती असतानाही कोणतीही दया न दाखवता झालेल्या या कथित हल्ल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणी राहुल भाऊसाहेब खैरे (वय ३९, रा. निमशेवडी, ता. राहाता) यांच्या फिर्यादीवरून सचिन पुरुषोत्तम भैरवकर (रा. सावळीविहीर) याच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम, २०१६ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


फिर्यादीनुसार, ५ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता सावळीविहीर येथील दोरडीया हॉस्पिटलजवळ राहुल खैरे हे जात असताना त्यांनी रस्त्याच्या कडेला लघुशंका केली. त्यावेळी आरोपी तेथे आला आणि “माझ्या घरासमोर लघवी का केली?” असा जाब विचारत संतापाच्या भरात लाकडी दांडक्याने हात, पाठ आणि पायावर सपासप वार करत बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता मोबाईल फोन फोडून टाकला, शिवीगाळ केली आणि दमदाटीही केली, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
डाव्या हाताला ४५ टक्के अपंगत्व असल्याने प्रतिकार करणे शक्य नव्हते, असे फिर्यादीने नमूद केले आहे. जखमी अवस्थेत ते घरी गेले. त्यानंतर कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर पोलि

सांच्या मेमोवर राहाता ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन ९ जुलै रोजी अधिकृत फिर्याद दाखल करण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम २०१६ मधील कलम ९२(अ), ९२(ब) तसेच भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ३५२ आणि इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
अपंग व्यक्तीवर कथितपणे झालेल्या या अमानुष हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, अशा समाजकंटकांविरुद्ध कठोर आणि धाकदायक कारवाई करून अपंग व्यक्तींच्या सुरक्षिततेची हमी प्रशासनाने द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button