Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
राजकीयशिर्डी

शिर्डी नगरपरिषदेतर्फे सन्मित्र युवक गणेश मित्र मंडळाचा गौरव पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी संयुक्त प्रथम पारितोषिक

शिर्डी | प्रतिनिधी :
शिर्डी नगरपरिषदेमार्फत स्वच्छ भारत मिशन (नागरी) २.० व माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रीगणेशोत्सव पर्यावरणपूरक सजावट स्पर्धा २०२५’ मध्ये सन्मित्र युवक गणेश मित्र मंडळाने उत्स्फूर्त सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी करत संयुक्त प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या स्पर्धेत मंडळाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, सामाजिक उपक्रम, स्वच्छता अभियान, अक्षय ऊर्जेचा वापर, शिस्तबद्ध नियोजन, आकर्षक व पर्यावरणस्नेही सजावट, हरित शपथ तसेच कृत्रिम तलावात गणेश विसर्जन यासारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून परीक्षकांची विशेष दाद मिळवली.


या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शिर्डी नगरपरिषदेच्या वतीने सन्मित्र युवक गणेश मित्र मंडळास प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी सन्मित्र मंडळाचे सर्वस्वी मार्गदर्शक व प्रेरणास्थान गजानन शेरवेकर यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.


पर्यावरण रक्षणाचा संदेश समाजात पोहोचवण्याचे कार्य सन्मित्र युवक गणेश मित्र मंडळाने केले असून, नगरपरिषद शिर्डीने मंडळाच्या कार्याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. हा सन्मान इतर गणेश मंडळांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button