Letest News
शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद. अखेर सागर बेगला न्यायालयाचा दणका! तात्पुरता जामीन रद्द अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला २५ गुन्हेगारी पूर... दरोड्याच्या तयारीत सराईत गुन्हेगारांची टोळी शिर्डी पोलिसांचा मध्यरात्री धडाका! “हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या!” राजेंद्र पिपाडांचा सुजय विखेंवर जहाल हल्लाबोल“रस्त्यासाठी... साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी... शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक...
अ.नगरशिर्डी

दिपावली निमित्‍त श्री साईबाबांच्‍या समाधी मंदिरात लक्ष्‍मी कुबेर पुजन करण्‍यात आले

शिर्डी –
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी परंपरेनुसार दिपावली निमित्‍त श्री साईबाबांच्‍या समाधी मंदिरात लक्ष्‍मी कुबेर पुजन संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी श्रींचे मुर्तिवर विविध सुवर्ण हिरेजडीत ४ किलो ८०० ग्रॅम वजनाचे आभुषणे चढविण्‍यात आले असून त्‍याची अंदाजे रक्‍कम १ कोटी २९ लाख ६९ हजार ४९५ रूपये इतकी आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रुढी परंपरेनुसार दिपावली निमित्‍त श्री लक्ष्‍मी पुजन उत्‍सव साजरा करण्‍यात आला.

आज सायंकाळी ०५.०० ते ०५.५५ यावेळेत समाधी मंदिराच्‍या गाभा-यात संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर यांच्‍या हस्‍ते लक्ष्‍मी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीगणेश पूजन, लक्ष्‍मी-कूबेर पूजन, सरस्‍वती पूजन व श्रींना धूप-नैवेद्य दाखविणे आदी कार्यक्रम झाले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडूळे, लेखाधिकारी अविनाश कुलकर्णी, मंदिर प्रमुख विष्‍णु थेरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. लक्ष्‍मी-कूबेर पूजन झाल्‍यानंतर सायंकाळी ०६.०० वाजता श्रींची धुपारती झाली. धुपारतीनंतर साईभक्‍तांसाठी दर्शनरांग सुरु करण्‍यात आली.

तर रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती झाली.
दिपावली उत्‍सवानिमित्‍त जालंधर, पंजाब येथील साईभक्‍त श्री मानव खुराणा, यांच्‍या वतीने देणगीस्‍वरुपात विद्युत रोषणाई व श्री साईबाबा समाधी मंदिरात व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button