शिर्डी येथे राहात असलेल्या सुनिता तुळशीराम मोरे हे यांचे दुकानात बसलेले असताना मोबाईल चोरण्यांचा प्रयत्न करणाऱ्याला चोरास धरून जनता टोला देण्यात आला असून त्याविरोधात शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादीत म्हटले आहे कि दिनांक 10/07/2025 रोजी रात्री 11/30 वा. चे सुमारास गुरुपौर्णिमा असल्याने दुकानावर मोबाईल पाहत बसले होते.
तेव्हा नगरपालीकेकडुन दोन मुले चालत दुकानाकडे आले. त्यातील एक मुलगा दुकानाचे बाहेर रस्त्यावर ऊभा राहीला. दुसरा मुलगा हा दुकानात आला व त्याने माझ्या हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून पळून घेवुन जाऊ लागला. त्यावेळी मी मोठमोठ्याने आरडा ओरडा केला असता बाहेर रस्त्यावर असणाऱ्या लोकांनी ते दोघे पळून जात असतांना त्यांचा पाठलाग करुन पकडुन ठेवले.
त्यावेळी ज्याने माझा मोबाईल हिसकावून घेवुन गेला होता, त्याच्या ताब्यातुन लोकांनी माझा मोबाईल ताब्यात घेतला असता त्याने लोकांना ढकलुन देवुन पळून गेला व त्याच्या सोबत असलेला दुसरा साथिदार यास लोकांनी धरून ठेवले. तेव्हा त्याठिकाणी माझे पुतणे आकाश व सुरज दोघे आले, त्यादोघांनी त्यास बळाचा वापर करुन, धरुन ठेवलेल्या मुलास पोलीसांच्या ताब्यात दिले.
तेव्हा पोलीसांनी त्यास त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव भिमराज संजय गायकवाड वय 19 वर्षे रा. पढेगाव ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर असे सांगुन त्याच्या सोबत असलेला व ज्याने मोबाईल हिसकावुन घेवुन पळत होता तो त्याचा भाऊ असल्याचे सांगत असुन त्याचे नाव अदित्य संजय गायकवाड वय 22 वर्षे रा. सदर असे असल्याचे सांगितले. ह्यावरून शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे