Letest News
वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन शिवसेना उद्धव गटाचे रावसाहेब खेवरे अखेर शिंदे शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभ... आधी ओळख मग मैत्री त्यानंतर योगेशचा त्या महिले सोबत ताथा थैया -हा गुन्हा खोटा की खरा चर्चांना उधाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर
क्राईमशिर्डी

त्या दीड कोटीच्या लाचेत धाकराव सह तत्कालीन पोलीस निरीक्षक दिनेश आहेर वर तात्काळ कारवाई व्हावी

स्थानिक गुन्हे शाखेने माझ्याकडून लाच म्हणून घेतलेले दिड कोटी रुपये परत द्यावे, अशी मागणी भूपेंद्र सावळेने राहाता न्यायालयात केली. त्याच्या वकीलांनी थेट पोलीस आयुक्तांकडे अर्ज दाखल केल्याने ग्रोमोर घोटाळ्यातील खटल्यात खळबळ उडाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

पोलिसांच्या कारवाईतून वाचवण्यासाठी लाचखोर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तुषार धाकराव याच्यासह पाच पोलिसांनी लाचेपोटी स्वीकारलेले दिड कोटी रुपये परत मिळावे यासाठी भूपेंद्रचे वकील बी. ए. हुसळे यांनी नाशिक विभागीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे रितसर अर्ज दाखल केला आहे.

ग्रोमोर घोटाळ्यातील प्रमुख आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे याला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अडवून आम्हाला दिड कोटी रुपये दे नाही तर तुझ्यावर गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकतो असे धमकावल्याने सावळेने तुषार धाकराव यांच्या पथकाला दिड कोटी रुपयांची लाच दिली होती.

याचा भांडाभोड भूपेंद्रला अटक झाल्यानंतर त्त्याने केला होता. सदर घटना अकार्यक्षम पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या काळात घडली होती. त्यानंतर ओला यांच्या जागी आलेले सोमनाथ घार्गे यांनी पोलीस खात्याची बदनामी होऊ नये म्हणून तुषार धाकराव याच्यासह पाच पोलीस निलंबीत केले होते.

पोलिसांचे निलंबन झाले असले तरी दिड कोटी कुणाच्या खिशात गेले? त्या दिड कोटीचे लाभार्थी कोण? हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. ह्या प्रकरणी दैनिक साईदर्शनाने राज्याचे पोलीस महासंचालक सह संबंधित विभागांना अर्ज केला होता कि आहिल्यानगरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनाही दोषी धरून तात्काळ निलंबित करून त्यावर देखील बडतर्फेची कारवाई व्हावी असे लेखी अर्ज दिले आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button