Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

शिर्डीचे भूमिपुत्र निस्सीम साईभक्त अन् कट्टर शिवसैनिक कमलाकर कोते यांचा आज वाढदिवस

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी शहराचे भूमिपुत्र, निस्सीम साईभक्त आणि शिवसेनेचे धडाडीचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यासह शिर्डी परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि साईभक्तांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून त्यांचा सत्कार व सन्मानही केला.
कमलाकर कोते हे लहानपणापासूनच कट्टर शिवसैनिक म्हणून कार्यरत आहेत. शिवसेनेच्या शाखाप्रमुखापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास आज जिल्हाप्रमुख पदापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या प्रवासात शिवसेनेने वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास दाखवत विविध जबाबदाऱ्या सोपवल्या. मिळालेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याची कला
कमलाकर कोते यांच्या व्यक्तिमत्त्वाची विशेष ओळख म्हणजे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची हातोटी. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
‘जय महाराष्ट्र ग्रुप’च्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम
कमलाकर कोते यांनी ‘जय महाराष्ट्र ग्रुप’ची स्थापना करून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही आपला ठसा उमटविला. शिर्डी शहरात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेत त्यांनी या उत्सवाला भव्य स्वरूप देण्यासाठी पुढाकार घेतला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शहरात आकर्षक आणि सामाजिक संदेश देणारे अनेक मोठे देखावे उभारण्यात आले. या देखाव्यांची शिर्डी परिसरात विशेष चर्चा झाली.


साईनगरी शिर्डीशी असलेले त्यांचे नाते केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून, साईबाबांवरील त्यांची असलेली निस्सीम श्रद्धा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग आहे. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय राहून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीसह राज्यातील अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात असून, विविध ठिकाणी त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात येत आहे.


कमलाकर कोते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
साईनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना की, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि समाजसेवेची अखंड ऊर्जा लाभो, हीच वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा.
जय साईनाथ!

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button