Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
अ.नगरखेळ

गणपती बसवा अन् पुरस्कार मिळवा

अहमदनगर :- यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव ७ सप्टेंबरपासून सुरू होतो आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाला पुरस्कार दिला जाणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवणे आवश्यक आहे. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. स्पर्धेत जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

निकष काय?

        सांस्कृतिक कार्यक्रम, संस्कृतीचे जतन, गडकिल्ले जतन व संवर्धन, सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषणरहित वातावरण, पारंपरिक देशी खेळांच्या स्पर्धा तसेच गणेशभक्तांसाठी देत असलेल्या सुविधांची पाहणी करून गुण दिले जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांनी केलेल्या कार्याबाबतचा कालावधी सन २०२३ च्या अनंत चतुर्दशी ते सन २०२४ च्या गणेश चतुर्दशीपर्यंतचा असेल.

प्रथम पुरस्कार पाच लाखांचा

DN SPORTS
        राज्यातील पहिल्या तीन क्रमांक विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावर २५ हजार रुपये

जिल्ह्यातून प्रत्येकी एक सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस केली जाईल. मंडळाचे नाव, सर्व कागदपत्रे व व्हिडीओसह राज्यस्तरीय निवड समितीकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविले जाईल. जिल्ह्यातील विजेत्या मंडळास २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र दिले जाईल.

३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा

        गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांना ३१ ऑगस्टपर्यंत mahotsav.plda@gmail.com या                 ई-मेल आयडीवर अर्ज करावा लागेल. मुदतीत अर्ज आलेल्या मंडळाची पाहणी केली जाणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधित तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क करावा.

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button