Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

तुम्हाला असलेल्या सत्तेचा व पैश्यांचा माज मागील निवडणुकीत जनतेने जिरवला :-डॉक्टर राजेंद्र पिपाडा

लोकसभेच्या निवडणुकीतुन पराभुत होवुन डोक्यावर मानसिक परिणाम झालेले काही लोक काल एका भाषणात म्हटले की विरोधकांकडे पैसे नाहीत……हे ते खरे बोलले कारण आम्ही शेतक-यांची मुले आहोत. आमचा कष्टाचा पैसा आहे. अदानींकडुन आम्ही पैसे आणत नाही. अदानींच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणुन जात नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

तुम्हाला असलेला सत्तेचा माज व पैशाची मस्ती राहाता न.पा.ची निवडणुक गणेश कारखान्याची निवडणुक व नुकतीच झालेली लोकसभेची निवडणुक यात सामान्य जनतेने तुमची जिरवली फक्त पैशाने निवडणुका जिंकता येत नाहीत हे दाखवुन दिले.

        आमच्या परिवाराकडे कुठले साखर कारखाने, शैक्षणिक संस्था, मेडीकल कॉलेज, इंजिनियरींग कॉलेज, आमदारकी, खासदारकी, जिल्हापरिषद, मंत्रीपदे नाहीत. तुमच्याकडे शासनाच्या तिजोरीतुन तसेच शेतक-यांना लुबाडुन कमवलेली कोट्यावधी रु.ची बेहिशोबी मालमत्ता आहे. 

आमच्या कुटुंबाने शासकीय जागांवर डल्ला मारुन कोट्यावधी रु.च्या बिल्डींग बांधलेल्या नाही. आमचा मुख्य वडीलोपार्जित व्यवसाय शेती आहे. माझे वडील हाडाचे शेतकरी आहेत. मी ही शेतकरी आहे. त्यामुळे शेतक-याचा पैसा हा कष्टाचा व घाम गाळुन कमवलेला असतो.

चार-चार पिढ्या गेल्या तरी तुम्हाला निवडणुकीच्या वेळी मुरुम टाकावा लागतो,,,दारु व मटन द्यावे लागते यापुढे लोक तुमचा हा फंडा निवडणुकीत चालु देणार नाहीत.

        आमच्या विरोधकांनी आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महिलांनी येवु नये म्हणून वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु कोणत्याही यंत्रणेला व दडपशाहीला बळी न पडता मोठ्या संख्येने स्वयंस्पुर्तीने महिला त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहील्या.













 कार्यक्रमाला महिला वाहून आणण्यासाठी आम्हाला कुठलीही यंत्रणा लावण्याची गरज पडली नाही. 
  जिरायत भागातील निळवंडेचे कालवे व शिर्डी संस्थानच्या कामगारांना 2009 मध्ये तुम्ही विरोध केला.













         साईबाबांचे हॉस्पीटल मोठे का होवु दिले जात नाही तेथील डॉक्टर का पळविले जातात त्याचे कारण तुम्हीच जाहीरपणे सांगितली की मला आता शिर्डी 200 खाटांचे हॉस्पीटल काढायचे आहे. तुमची दुकानदारी चालण्याकरीता गोरगरीबांसाठी असलेले साईबाबांचे हॉस्पीटल बंद करण्याचे पाप करु नका.

रुई गावात मला बंदी घाला याचा बोलविता धनी कोण आहे त्यांच्या पोटातील मळमळ बाहेर निघाल्यावर लोकांना समजले.

पिता-पुत्रांची हुकुमशाही व हिटलरशाही विरोधात माझा लढा चालुच राहील व तुम्हाला सत्तेचा आलेला माज व पैशाची मस्ती शिर्डी मतदार संघातील जनता सहन करणार नाही

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button