Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

सावळीविहीर भारत पेट्रोल पंपावर साईभक्त दांपत्यावर निर्दय मारहाण — महिलेलाही हात उचलला-संतप्त साईभक्तांकडून कठोर कारवाईची मागणी

शिर्डी (दि. 25 ऑक्टोबर 2025) — साईनगरी शिर्डीच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. शिर्डीजवळील नागपूर–मनमाड महामार्गावरील सावळीविहीर येथील भारत पेट्रोल पंपावर एका साईभक्त दांपत्यावर आणि महिलांवर पंपावरील कर्मचार्‍यांनी व मालकाने उघडपणे मारहाण केली. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


💥 घटनेचा धक्कादायक तपशील

पीडिता नमिता शुभम घरद (वय 28, रा. उरण नवी मुंबई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या पती शुभम जगदीश घरद आणि नातेवाईकांसह दर्शनासाठी शिर्डी येथे आल्या होत्या.
२५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांची टाटा अल्ट्रोज (MH 46 CR 7914) गाडी CNG भरण्यासाठी सावळीविहीर येथील भारत पेट्रोल पंपावर गेली. तिथे दोन तास प्रतीक्षा केल्यानंतरही CNG न मिळाल्याने त्यांनी पंपावरील कर्मचारी विशाल नामदेव सोनवणे यास विचारले — “आम्ही दोन तासांपासून थांबलो आहोत, आमची गाडी कधी?”

त्यावरून संतप्त कर्मचार्‍यांनी नामिता यांना शिवीगाळ केली. थोड्याच वेळात मालक योगेश राम जपे व कर्मचारी आकाश बाळु आंभोरे यांनी धक्काबुक्की करून दांपत्यावर मारहाण केली.
त्यावेळी मदतीला गेलेल्या साईभक्त महिलेलाही ढकलण्यात आणि चापट्या मारण्यात आले, असा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे.


⚖️ आरोपींची नावे व गुन्हा दाखल

पीडिता नमिता घरद यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात खालील तिघांविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे:

1️⃣ विशाल नामदेव सोनवणे – रा. सावळीविहीर, ता. राहाता
2️⃣ आकाश बाळु आंभोरे – रा. सावळीविहीर, ता. राहाता
3️⃣ योगेश राम जपे – (मालक), रा. सावळीविहीर, ता. राहाता

या सर्वांवर शाब्दिक धमक्या, शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


😡 साईभक्तांचा संताप — “शिर्डीची बदनामी थांबवली पाहिजे!”

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरताच साईभक्त व स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
सावळीविहीर येथील हा पंप नेहमीच वादग्रस्त राहिला असून, तिथे CNGसाठी दररोज एक–एक किलोमीटर लांब रांग लागते. ट्रॅफिक जाम आणि ग्राहकांशी गैरवर्तन ही नेहमीची बाब बनली आहे, असे नागरिक सांगतात.

साईभक्तांचा सवाल असा आहे — “शिर्डी सारख्या पवित्र भूमीत दर्शनाला आलेल्या महिलांवर हात उचलणे हे कितपत योग्य आहे?”
पंपावरील कर्मचाऱ्यांच्या दादागिरीला आता आवर घालावा, अशी जोरदार मागणी होत आहे.


🚨 कडक कारवाईची मागणी

स्थानिक नागरिक, साईभक्त संघटना आणि सोशल मीडिया कार्यकर्त्यांनी या प्रकाराची कठोर निंदा केली असून,
👉 संबंधित पंपावरील मालक व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी,
👉 पंपाचे परवाने व व्यवहार तपासावेत,
👉 तसेच भविष्यात साईभक्तांशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कडक शिक्षेचे उदाहरण घालावे,
अशा मागण्या जिल्हा प्रशासनाकडे जोर धरत आहेत.


✊ साईभक्तांची भूमिका

“साईनगरीत भक्तांवर हात उचलणाऱ्यांना क्षमा नाही!”
— अशा संतप्त घोषणा सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.
शिर्डीच्या पवित्र वातावरणाला धक्का देणारा हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, अशी एकमुखी भूमिका साईभक्त समाजाने घेतली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button