Letest News
साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा
Blog

शिर्डीत मद्यविक्रीला परवानगी नसतानाही अवैध दारू धंदे तेजीत!

शिर्डी( प्रतिनिधी )
शिर्डी हे श्री साईबाबांमुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाले असून येथे देश-विदेशातून दररोज हजारो साई भक्त साई दर्शनासाठी येत असतात .अशा शिर्डी शहरांमध्ये साई भक्तांना येथे आल्यानंतर तळीरामांकडून त्रास होतो. म्हणून शिर्डी शहरात देशी विदेशी दारू दुकाने बंद करावे व नवीन दुकानांना परवानगी देऊ नये अशी मागणी तत्कालीन संस्थांनचे अध्यक्ष पी.के सावंत यांनी 1985 साली तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती. त्याची दखल घेत सन 1987 साली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येथील दारू दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले. तसेच आज पर्यंत गेल्या 36वर्षात कोणालाही नव्याने दारू विक्रीचा परवाना देण्यात आलेला नाही. असे असताना वर्षभरात येथे अनेक अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आलेली असल्यामुळे शिर्डीतील ही दारूबंदी केवळ कागदपत्रे असल्याचे त्यातून निष्पन्न होत आहे. अधिकृत दारू दुकाने नसले तरी अनधिकृतपणे दारू धंदे येथे मोठ्या तेजित सुरू आहेत. साई भक्तांना त्रास होतो म्हणून येथे सरकार दारू दुकानांना परवानगी देत नाही आपला शासकीय करही बुडला जात असतानाही शासनाने तो निर्णय घेतला. मात्र अनधिकृत पणे कोणताही कर न भरता येथे अवैध दारू धंदे जोरात सुरू आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न साईभक्त व नागरिकांकडून सध्या विचारला जात आहे. शासनाने याकडे विशेष लक्ष घालण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
शिर्डी एक धार्मिक क्षेत्र आहे. येथे साईभक्त येतात. अनेक महत्त्वाच्या व्यक्ती येतात. येथे धार्मिक व चांगले वातावरण राहावे. साई भक्तांना त्रास होऊ नये .कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी श्री साईबाबा संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष पी.के सावंत यांनी पत्र क्रमांक 7/80 26 1985 तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह निलंगेकर यांना देऊन त्यांचे या प्रकरणी लक्ष वेधले होते. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले व जिल्हाधिकारी यांनी पत्र क्रमांक 11 275/ 15/ 10 87 रोजी आदेश काढून या आदेशानुसार शिर्डी शहरातील दारू परवाने रद्द करून गेल्या 36 वर्षात कोणत्याही नव्याने दारू विक्री परभणी येथे दिले गेले नाहीत. अशी माहिती जितेश लोकचंदानी यांनी माहिती अधिकारात मागे काढली होती .शिर्डीत अधिकृत दारू विक्री परवानगी नसताना अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे त्यातून निष्पन्न झाले होते. सध्याही येथे अवैध दारू धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अनेक गल्लीबोळात देशी विदेशी दारू विकली जाते. काही वेळेस छापे टाकून कारवाई करण्यात येते. कारण येथे अनेक अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याची अधिकृत नोंद पोलीस स्टेशनला होती. याचाच अर्थ शिर्डी शहरात अवैध दारू विक्री जोरात सुरू असून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेकदा छापे टाकले जातात. कारवाई केली जाते .मात्र जैसी ती परिस्थिती काही दिवसांनी येथे होत असून दारू विक्री करणारे व दारू प्राशन करून शिवीगाळ करणारे हाणामारी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे साई भक्तांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे याकडे शासनाने, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी विशेष लक्ष द्यावे व शिर्डीतील अवैध दारू धंदे इतर अवैध धंदे त्वरित बंद व्हावे. म्हणून विशेष प्रयत्न करावे .अशी मागणी साई भक्त व नागरिकांकडून सध्या होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button