Letest News
साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा
क्राईमशिर्डी

एक महिलेचे शिर्डी एटीएम मधून काढलेले पैसे धूम स्टाईल अज्ञात चोरट्यांनी लांबवली!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथून एटीएम मधून पैसे काढून साईनाथ हॉस्पिटल कडे पायी जात असताना पानमळा शहरात मोटरसायकलवर अनोळखी इसम मागून येऊन त्याने माझ्या खांद्याला अडकवलेली चॉकलेट रंगाची नऊ हजार पाचशे रुपये असलेली पर्स धुम स्टाईल पळून नेली असल्याची फिर्याद डोहाळे येथील विद्या प्रसाद शिरसाट यांनी शिर्डी पोस्टेला दिली आहे. यासंदर्भात पोलीस उत्तरांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

विद्याप्रसाद शिरसाट यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,दिनांक 17मार्च 2025 रोजी सकाळी 10.30 वा चे सुमारास मी माझा मुलगा ओम यास घेवुन श्री. साईनाथ हॉस्पीटल शिर्डी ता राहाता येथे उपचारकामी घेवुन आले होते. मुलगा ओम यास डॉक्टरांकडे तपासुन आमलेनंतर त्याचे रिपोर्ट दुपारी 03.00 वा. देणार असल्याने मी मुलगा ओम यास घेवुन शिर्डी येथील आर.बी.एल. चौकाचे जवळ असलेले इको बँकेचे ए.टी.एम. मधुन पैसे काढण्यासाठी गेले.

पैसे काढलेनंतर मी ते पैसे माझेकडील पर्समध्ये ठेवले व मुलगा ओम व मी असे ए.टी.एम. कडुन श्री. साईनाथ हॉस्पीटल कडे पायी येत असताना दुपारी 01.45 वा चे सुमारास पानमळा शिवारात एक मोटार सायकल व त्यावर एक अनोळखी इसम हा आमच्या पाठीमागुन आला व त्याने माझे खां‌द्याला अडकवलेली चॉकलेटी रंगाची पर्स बळजबरीने हिसकावुन घेवुन श्री. साईनाथ हॉस्पीटलचे दिशेने मोटार सायकलवर जोरात निघुन गेला.

त्यानंतर मी व मुलगा ओम असे त्याचे गाडीचे पाठीमागे आरडा ओरडा करत पळालो परंतु तो आमचे हाती लागला नाही. माझे पर्समधील नऊ हजार पाचशे रुपये एटीएम कार्ड पासबुक पॅन कार्ड ,विश्वकर्मा योजनेचे कार्ड ,हॉस्पिटलचे ऑपरेशनचे दोन कार्ड व मतदान कार्ड असे या पर्समध्ये होते. ते सर्व चोरट्यांनी पर्स सह पळवून नेले असल्याची फिर्याद विद्या प्रसाद शिरसाठ यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात केली आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button