Letest News
शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश गॅस साठी हवालदिल शिर्डी-24 तासांत व्यवस्था सुधारा अन्यथा आमरण उपोषण – समीर विर यांचा एल्गार शिर्डीत ‘गणेश गॅस एजन्सी’चा काळाबाजार उफाळला रांगेत श्रीमंतांना मागच्या दाराने सिलेंडर – प्रशासन झोप... मध्यरात्री दरोड्याने थरकाप-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाची दमदार कामगिरी – आंतरजिल... शिर्डीत ‘जमीन सौदा’ बॉम्ब फुटणार? भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या ५० कोटींच्या व्यवहारावर पोलिसांची ... पोटनिवडणुकीत माध्यमांवर कडक नियम-जाहिरातींसाठी पूर्व मंजुरी अनिवार्य नाशिक प्रकरणात खळबळ! भोंदू बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ – ‘५ नरबळी’चा धक्कादायक संशय
राजकीयशिर्डी

शिर्डीत साईचरणी सुनीता आहुजांचं भावनिक साकडं- ‘नववर्षात गोविंदा घरी यावा’ प्रार्थना

साईचरणी भावनिक साकडे : सुनीता आहुजांचं शिर्डीत दर्शन
प्रसिद्ध अभिनेते गोविंदा यांच्या पत्नी सुनीता आहुजा यांनी आज आपल्या आईसह श्रीक्षेत्र शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी साईचरणी कुटुंबाच्या सुख-शांतीसाठी प्रार्थना करत, नववर्षात पती गोविंदा घरी परत यावेत, असे भावनिक साकडे घातले.
‘गतवर्ष वाईट गेलं, पण साईच्या आशीर्वादानं नववर्ष चांगलं जाईल’
दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना सुनीता आहुजा म्हणाल्या, “गतवर्ष आमच्यासाठी खूप वाईट गेले. मी कधीच खोटं बोलत नाही. मात्र साईबाबांच्या कृपेने हे नवीन वर्ष आमच्या परिवारासाठी सुखाचे, निरोगी आणि आनंदाचे जाईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
दर्शनानंतर मनाला समाधान आणि शांती मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
गोविंदासाठी विशेष प्रार्थना : ‘सद्बुद्धी मिळो, हिरोची इमेज परत मिळो’
पती गोविंदाबाबत सुरू असलेल्या विविध चर्चांवर बोलताना सुनीता आहुजा म्हणाल्या की, “गोविंदासाठीही हे वर्ष चांगले जावे. साईबाबांनी त्यांना सद्बुद्धी द्यावी. त्यांनी योग्य तेच काम करावे आणि पुन्हा एकदा आपली हिरोची प्रतिमा मिळवावी,” अशी प्रार्थना आपण साईचरणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
घटस्फोट व अफेअरच्या चर्चांवर परखड भूमिका
गोविंदा व सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या,
“घटस्फोटाच्या चर्चा गोविंदाला शोभत नाहीत. जो कोणी माझं घर तोडण्याचा प्रयत्न करतोय, त्याला साईबाबा कधीच माफ करणार नाहीत.”
गोविंदाच्या एका अभिनेत्रीबरोबर अफेअरच्या चर्चांवर त्या म्हणाल्या, “ती मुलगी फक्त पैशासाठी त्यांच्यासोबत आहे. चाळीस वर्षांचा संसार कोणतीही तोडू शकत नाही. साईबाबा आमच्या पाठीशी आहेत.”
‘मुलांनी स्वतःच्या हिंमतीवर नाव कमवावं’
मुलांच्या भविष्याबाबत बोलताना सुनीता आहुजा म्हणाल्या, “मी स्वतःच्या हिंमतीवर नाव कमावले आहे. आजही लोक मला गोविंदाची बायको म्हणून ओळखतात, मात्र सोशल मीडियावर मी आजही ‘सुनीता आहुजा’ आहे. माझ्या मुलांनीही स्वतःच्या मेहनतीवर चित्रपटसृष्टीत नाव कमवावे. त्यांना कोणतीही मदत केली जात नाही.”
‘कुटुंबापेक्षा मोठं काहीच नाही’ – सुनीता आहुजा
शेवटी त्या म्हणाल्या, “परमेश्वराने गोविंदाला सद्बुद्धी द्यावी. त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा करून कुटुंबाकडे लक्ष द्यावे. कुटुंबापेक्षा मोठं काहीच नाही. लोक पैशासाठी येतात-जातात, पण कुटुंबीयांचं प्रेम मनापासून असतं. गोविंदाने दर्जेदार, संस्कार देणारे चित्रपट करावेत, जे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहू शकेल,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button