Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
Blogअ.नगरराजकीय

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महसूल समाधान शिबिरात १३६ दाखल्यांचे वाटप नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत आज कोपरगाव मंडळाधिकारी कार्यालयात आयोजित शिबिरात १३६ महसूल दाखल्यांचे तहसीलदार महेश सावंत यांचे हस्ते वाटप करण्यात आले. या शिबिरात शेतकरी, महिला, विद्यार्थी तसेच संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना महसूल विषयक विविध दाखले व लाभ प्रदान करण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिबिरास शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर व कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांनी मार्गदर्शन केले.शिबिरात उत्पन्न दाखले – ४०, जातीचे दाखले – २२, जिवंत ७/१२ मोहिमेंतर्गत वारस फेरफार – ८, रेशनकार्ड वाटप – २१, ७/१२ व ८ अ उतारे – ४५, संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी – १८ अशा एकूण १३६ दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी निवासी नायब तहसीलदार श्रीम. प्रफुल्लिता सातपुते, मंडळाधिकारी मच्छिंद्र पोकळे, ग्राम महसूल अधिकारी जगदीश शिरसाठ (कोपरगाव), अश्विनी निर्मळ (येसगाव), वैशाली दुकळे (मुर्शतपूर), वाल्मिक पवार (शिंगणापूर) तसेच महसूल सेवक व कर्मचारी उपस्थित होते.

या शिबिराला कोपरगाव मंडळातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महसूल सेवा थेट शिबिरात उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button