Letest News
“दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे
अ.नगरराजकीय

मनोज जरांगे 3 ते 4 दिवसांत जाहीर करणार उमेदवार

तुम्ही सगळ्या 288 मतदारसंघात अर्ज भरून ठेवा. एका मतदारसंघात दोघा तिघांनी अर्ज भरा. मग आपण बघू की कोण निवडून येऊ शकतो असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. तसंच ज्यावेळी मी सांगेन तेव्हा अर्ज मागे घ्यायचा असंही त्यांनी सांगितलं आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवली सराटीत मराठा समाजाची बैठक घेतली. या बैठकीत मनोज जरांगेंनी मराठा बांधवांशी संवाद साधत विधानसभा निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेतला. राज्यात 36 मतदारसंघात फक्त मराठ्यांच्या मतदानावर उमेदवार निवडून येऊ शकतात.

ज्यांनी मराठ्यांना संपवलं त्यांना संपवण्यासाठी लढावं लागेल. मात्र समीकरण न जुळल्यास अर्ज मागे घ्यावा लागेल असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. जिथे आपला उमेदवार नाही तेथील उमेदवाराकडून आपल्या मागण्यांशी सहमत असल्याचं बाँडवर लिहून घ्या असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे.

जिथे निवडून येईल तिथे उभा करू. SC, ST चा आपल्या विचारांचा उमेदवार निवडून देऊ. आपल्या मागण्या मान्य असल्याचं जो उमेदवार स्टॅम्पवर आपल्याला लिहून देईल त्याला पाठिंबा देऊ.

कोणत्या मतदारसंघात उभं करायचं हे मी दोन ते तीन दिवसात मतदा संघ सांगतो. तुम्ही सगळ्या 288 मतदारसंघात अर्ज भरून ठेवा. एका मतदारसंघात दोघा तिघांनी अर्ज भरा. मग आपण बघू की कोण निवडून येऊ शकतो. ज्यावेळी मी सांगेन की अर्ज मागे घ्यायचा.

आपण चौफेर वार करायचा आहे. यांची चिरफाड अशी करावी लागणार आहे. अर्ज काढून घे म्हटलं तर नाराज व्हायचं नाही. ज्यांनी मराठ्यांना संपलं त्यांना संपवायचंच गप्प बसायचं नाही. आता तुम्ही फॉर्म भरून या तुमचे पैसे बुडणार नाहीत काढून घे म्हटलं की तुमचे पैसे वापस येतील. नंतर आपण मेरीट नुसार ठरवू, असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button