Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरक्राईम

अखेर दुर्दैवाने पोलीस कर्मचारी वाळके यांचे उपचारादरम्यान निधन! पोलीस दलात हळहळ!

शिर्डी( प्रतिनिधी) संगमनेर येथे कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी वाळके यांनी काही दिवसापूर्वी शिर्डीत राहत्या ठिकाणी इमारतीवरून उडी घेऊन ‌ आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना उपचारार्थ शिर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .मात्र त्यांच्यावर उपचार करत असताना अखेर दुर्दैवाने त्यांचे आज निधन झाले आहे.त्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
शिर्डी येथे‌ राहत असणाऱ्या व संगमनेर पोलीस स्टेशनला कार्यरत असणाऱ्या वाळके पोलिसाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नशीब बलवत्तर म्हणून हा पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावला होता. मात्र त्यांचे आज अखेर उपचारा दरम्यान निधन झाले.
संगमनेर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस नाईक पदावर काम करत असणारा वाळके नावाचा तरुण पोलीस कर्मचारी हा शिर्डी येथे राहत होता. पूर्वी तो शिर्डी पोलीस स्टेशन येथे कार्यरत होता .मात्र त्याची बदली संगमनेर पोलीस स्टेशनला झाली होती . तेथे तो सध्या कार्यरत होता. काही कारणास्तव पोलीस नाईक वाळके यांनी राहत असणाऱ्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत त्यास श्री साईनाथ सुपर हॉस्पिटल शिर्डी येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली त्यांची तब्येत आता ठीक आहे. मात्र त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला ? हे मात्र अजूनही समजले नाही. पोलीस नाईक वाळके यांच्या मोबाईल मध्ये सर्व रेकॉर्डिंग असल्याचे खात्रीशीर माहिती आहे. पोलीस नाईक वाळके व त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग त्यांच्या मोबाईल मध्ये आहे वरिष्ठाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला की काय? अशी शंका आता नागरिकांमधून कुजबुजू लागली आहे. मात्र नेमकी आत्महत्या करण्याचा प्रयत्न कशावरून केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही त्याचा छडा पोलिसांनी लावावा . अशी मागणी होत असतानाच त्यांचे आज अखेर निधन झाले आहे . या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी. अशी मागणी आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button