Letest News
रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक... रंजल्या-गांजल्यांच्या आधारासाठी दानशूर पंकज लोढांचा पुढाकार स्नेहालयासाठी ११ गुंठे जमीन देणगी सन्मित्र युवक मंडळाचा ६२ वा गणेश याग आजपासून कर्तव्यावर सापडली सोन्याची अंगठी पुजाऱ्याने दाखविली प्रामाणिकता ३४ वर्षांची परंपरा कायम डीजेला फाटा देत क्रांती युवक मंडळाचा भक्तिमय गणेशोत्सव! साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे...
अ.नगरक्राईम

चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी

राहता | प्रतिनिधी :
राहता शहरातील पिंपळस रोड परिसरात चिक्की, बिस्किटे व चॉकलेटच्या नावाखाली प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित ठिकाणी खुलेआम गुटख्याची विक्री होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, डायमंड डी लाईट डिस्ट्रीब्यूटर, पिंपळस रोड, कांकरिया किराणा शॉप, शिवशक्ती क्लॉथ सेंटरसमोर या परिसरात चिक्की, बिस्किटे व चॉकलेटच्या नावाखाली गुटखा विक्री होत असल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे तरुण पिढीवर विपरीत परिणाम होत असून, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणाची राहता पोलीस निरीक्षक सरोदे यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित ठिकाणी तपासणी व चौकशी करावी, तसेच आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी राहता शहरातील नागरिकांनी केली आहे.
प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागाने संयुक्तपणे मोहीम राबवावी, अशीही नागरिकांची अपेक्षा आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button