Letest News
जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन ठगसेन भूपेंद्र सावळेचे साथीदार फरार आरोपींना कोणाचे अभय?" – DGP समोर डॉ. राजेंद्र पिपाडांचा संतप्त स... "साईनगरीत वाढत्या गुन्हेगारीवर डॉ. पिपाडांचा पोलिस महासंचालकांना भावनिक पत्र " श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु...
Blog

शिर्डीत ज्येष्ठ पत्रकाराचे दुकान फोडले* ! *अन् तंबाखुचे पुडेही नाही सोडले !!

शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी मध्ये दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून नागरिकांमध्ये त्यामुळे मोठी घबराट निर्माण झाली आहे.

sai nirman
जाहिरात

शिर्डी नजीकच्या बिरोबाबन येथील प्रसिद्ध अशा विरभद्र महाराज मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मंदिरा समोरील चांदीच्या पादुका चोरुन नेल्याची घटना घडली आहे .तर या चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. माञ तो असफल ठरल्याचे दिसून येत आहे.

या घटनेमुळे शिर्डीसह पंचक्रोशीतील विरभद्र भाविकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत असुन विरभद्र मंदिर हे पंचक्रोशीतील अराध्य दैवत आहे. यामुळे ही घटना कोण्या परंप्रातीय चोरट्यांनी केली असल्याचा संशय विरभद्र भाविकांनी व्यक्त केला आहे..

DN SPORTS

तर अशा विकृत मानसिकतेला पोलीसांनी तपास करुन कारवाई करावी अशी मागणी नानासाहेब काटकर , संपत जाधव , रमेश बनकर , प्रवीण बनकर , तसेच विरभद्र भगत हरी बनकर यांनी केली आहे. श्री वीरभद्र मंदिर हे श्री साईबाबा नंतर शिर्डीतील प्रसिद्ध मंदिर आहे. येथे भाविक दर्शनाला जात असतात. येथील दानपेटी मध्ये देणगी देत असतात. परंतु येथील दानपेटी फोडून या रकमेची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली आहे. त्यामुळे बिरेबन व  संपूर्ण शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली असून जो कोणी हा गुन्हा केला आहे .त्यावर कारवाई व्हावी.त्यास लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी येथील भाविकांनी केली आहे. 

त्याचप्रमाणे कालिकानगर परिसरात ज्येष्ठ पत्रकार पाटणी यांचे किराणा दुकान फोडून ४० हजाराचा किराणा चोरीला गेल्यामुळे आणखी या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

शिर्डी शहरातील जेष्ठ पत्रकार बाबुलाल पाटणी,रा. कालिका नगर शिर्डी यांचे घराजवळ किराणा दुकान असुन ३१ ऑक्टोबर २०२३ च्या मध्यरात्री दोन अडीच वाजेच्या सुमारास लोखंडी गेट चे कुलूप उडून दुकानाच्या दरवाज्याला लावलेले कुलुप तोडून तीन चोरट्यांनी धाडसी चोरी केली असून या चोरी चाळीस हजार रुपयांचा किराणा व पाच हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरी गेल्याची तक्रार पत्रकार सुदेश पाटणी यांनी शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीत केली असून हे तिन्ही चोरटे सीसीटीव्ही देखील दुचाकी वर फिरताना केंद्रित झाले असून दुकानात असलेले महत्त्वाचे किराणा साहित्य या चोरट्यांनी गोण्यामध्ये भरून घेऊन चोरून नेले आहे ग्राहकांच्या सेवेसाठी दुकानांमध्ये दिवाळी जवळ आल्यामुळे विक्रीसाठी हे साहित्य दोन दिवसापूर्वी भरलेले होते. चोरट्यांनी धाडसी ही चोरी केली असून  या चोरट्यांचा शिर्डी पोलिसांनी तातडीने शोध घेऊन कारवाई करावी. अशी मागणी पुढे आली आहे.या चोरीच्या घटनेनंतर तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ व पोलीस पथकाने भेट देऊन पाहणी केली. शिर्डी परिसरात सध्या अशा चोऱ्या परत एकदा सुरू झाल्या असून रात्रीची गस्त वाढवावी व अशा घरफोडी, मंदिरातल्या पेट्या फोडणाऱ्या चोरांना त्वरित तपास लावून अटक करावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button