Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
Blog

श्री स्वामिनारायण बहुउद्देशीय संस्कार सत्संग मंडळाची स्थापना_ हिरालाल लोथे विश्वस्तपदी नियुक्त

नाशिक | प्रतिनिधी
समाजातील सर्व स्तरांपर्यंत आध्यात्मिक मूल्ये, संस्कार, सामाजिक बांधिलकी व आधुनिक माध्यमांच्या साहाय्याने प्रबोधन पोहोचावे या उदात्त हेतूने सद्गुरूशास्त्री श्री भक्तीप्रकाश दासजी यांच्या संकल्पनेतून श्री स्वामिनारायण बहुउद्देशीय संस्कार सत्संग मंडळ याची नाशिक येथे भव्य स्थापना करण्यात आली आहे.
या नव्याने स्थापन झालेल्या संस्थेच्या विश्वस्तपदी भारतीय मिडिया फाउंडेशन इलेक्ट्रॉनिक मिडिया सेलचे राष्ट्रीय सचिव माननीय हिरालाल लोथे यांची नियुक्ती करण्यात आली असून, या निवडीबद्दल सर्वत्र समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे.
सदर संस्था आध्यात्मिक, शैक्षणिक, योगाभ्यास, आरोग्य व वैद्यकीय सेवा, क्रीडा, रोजगारनिर्मिती, सामाजिक उपक्रम, गोरक्षा अशा विविध क्षेत्रांमध्ये व्यापक स्वरूपात कार्य करणार आहे. विशेषतः समाज माध्यमांचा सर्व वयोगटांमध्ये वाढता प्रभाव लक्षात घेऊन दृकश्राव्य प्रणालीद्वारे शिबिरे, प्रशिक्षण वर्ग, संस्कार शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, त्याच धर्तीवर भविष्यात स्वतंत्र कायमस्वरूपी वृत्तवाहिनी सुरू करण्याचा मानस संस्थेमार्फत व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, माननीय हिरालाल लोथे यांनी यापूर्वी भारतीय मिडिया फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चेअरमन (जनरल कमिटी) या पदावर कार्यरत असताना संपूर्ण महाराष्ट्रभर अतुलनीय व उल्लेखनीय कामगिरी बजावली. पत्रकार संघटना म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतातील असंख्य पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, शासनस्तरावर अनेक महत्त्वाच्या विषयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास त्यांनी प्रशासनाला भाग पाडले.
अन्यायग्रस्त पत्रकार व नागरिकांना योग्य मार्गदर्शन, कायदेशीर पाठबळ व प्रशासनाशी समन्वय साधून न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेले कठोर परिश्रम सर्वश्रुत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारतीय मिडिया फाउंडेशनच्या राष्ट्रीय समितीने त्यांना मोठ्या जबाबदारीचे पद देत राष्ट्रीय सचिव – इलेक्ट्रॉनिक मिडिया सेल या पदावर नियुक्ती केली आहे.
या दुहेरी सन्मानाबद्दल प्रशासकीय व पोलिस अधिकारी-कर्मचारी, राजकीय नेते, सामाजिक संस्था, विविध संघटना तसेच पत्रकारिता, शिक्षण, अध्यात्म, समाजसेवा क्षेत्रातील ज्येष्ठ-श्रेष्ठ व समाजसुधारकांनी माननीय हिरालाल लोथे यांचा शुभेच्छांचा वर्षाव करत गौरव केला आहे.
ही नियुक्ती व संस्था स्थापनेमुळे समाजप्रबोधनाच्या कार्याला नवे बळ मिळणार असून, भविष्यात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडेल, असा विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात आहे. 🌸

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button