Letest News
चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ...
राजकीयशिर्डी

शिर्डीतील समाजशील दीपस्तंभ मावळलाज्येष्ठ सामाजिक नेते कै. मारुती एकनाथ फुंदे यांचे दुःखद निधन

[12:35, 22/1/2026] ………..: ज्येष्ठ सामाजिक नेते कै. मारुती एकनाथ फुंदे यांचे दुःखद निधन
शिर्डी : शांत, संयमी आणि समाजासाठी अखंड झटणारे व्यक्तिमत्त्व आज कायमचे निघून गेले. येथील जेष्ठ सामाजिक नेते कै. मारुती एकनाथ फुंदे यांचे आज दि. 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 06.30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ फुंदे कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण शिर्डी परिसरावर शोककळा पसरली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


कै. मारुती एकनाथ फुंदे म्हणजे माणुसकी, साधेपणा आणि सेवाभाव यांचा जिवंत आदर्श होता. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता त्यांनी आयुष्यभर समाजासाठी काम केले. गरिबांच्या दुःखात ते आधार बनून उभे राहिले, तर तरुणांच्या वाटचालीत ते मार्गदर्शक ठरले. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे वडीलधाऱ्या माणसासारखा मायेचा हात अनेकांना लाभला.


पत्रकार राहुल मारुती फुंदे यांचे ते केवळ वडील नव्हते, तर विचारांचे बळ, संस्कारांचे शिल्पकार आणि जीवनातील प्रेरणास्थान होते. त्यांचा पितृछत्र हरपल्याने राहुल फुंदे व कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात पुत्र पत्रकार राहुल मारुती फुंदे, श्री महेश मारुती फुंदे, आप्तेष्ट, नातेवाईक असा मोठा परिवार आहे.
कै. मारुती एकनाथ फुंदे यांचा अंत्यविधी आज गुरुवार दि. 22/01/2026 रोजी दुपारी 02.00 वाजता अमरनाथ धाम, शिर्डी येथे होणार आहे.


एक निस्वार्थी समाजसेवक, मार्गदर्शक आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असून, त्यांच्या आठवणींना डोळ्यांत अश्रूंचा अभिवादन केला जात आहे.
दैनिक साई दर्शन परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली
“कष्ट, प्रामाणिकपणा आणि माणुसकी या मूल्यांवर जगलेले कै. मारुती एकनाथ फुंदे यांचे जीवन अनेकांसाठी दीपस्तंभ ठरले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो व फुंदे कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो.”
भावपूर्ण श्रद्धांजली… 🙏

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button