Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरशिर्डी

जीवनात चढ-उतार येतात. या चढउतारातून मार्ग मिळू दे अडचणींचा सामना करण्याची शक्ती दे! अशी साईचरणी केली प्रार्थना– माजी खासदार प्रिया दत्त

शिर्डी (प्रतिनिधी) जीवनात अनेक चढउतार येतात. या अडचणींचा सामना करण्याची शक्ती साईबाबांकडून मिळावी एवढीच साई चरणी प्रार्थना केली आहे. असे माजी खासदार प्रिया दत्त यांनी शिर्डीत सांगितले.
माजी खासदार प्रिया दत्त यांनी आज शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना प्रिया दत्त यांचे डोळे पाणावले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावर बोलताना प्रिया दत्त यांनी म्हटलं, “माझी आई अभिनेत्री नर्गीस दत्त‌ ही साईबाबांची परमभक्त होती. ती आजारी असतानाही शिर्डीला येत असे. आज शिर्डीत येवून साईंचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. आम्ही जीवनात अनेक चढ-उतार बघितले. मात्र, आपल्यात ती ताकद हवी. साईंचा आशीर्वाद असला तर नक्कीच चांगलं होतं. साईंकडे मी तेच मागितलं आहे.

साईबाबांच्या दर्शनासाठी आल्यानंतर मी प्रत्येकवेळी काहीच मागत नाही. जीवनात अनेक चढ-उतार येतात. या अडचणींचा सामना करण्याची शक्ती साईबाबांकडून मिळावी, एवढीच प्रार्थना साईचरणी केली आहे,”

असं प्रिया दत्त यांनी म्हटलं आहे. पुढे प्रिया दत्त यांनी, आपण साईबाबांचं दर्शन घेवून मंदिराबाहेर आल्यानंतर भाऊ संजय दत्त आणि आम्ही दोघी बहिणींनी एकत्रित साईंच्या दर्शनासाठी यावं असा विचार मनात आल्याचं सांगितल . साईबाबांचं बोलवणं आलं तर लवकरच आम्ही तिघे भाऊ-बहीण एकत्र साईबाबांच्या दर्शनासाठी येणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button