Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
Blog

श्रीलंकेच्या अशोक वनातून अयोध्येला श्रीरामाच्या पवित्र पादुका जात असताना 27 डिसेंबरला येणार साईनगरीत!

शिर्डी (प्रतिनिधी )आयोध्याला श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य मंदिरामध्ये श्रीरामाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी होणार असून त्यानिमित्ताने श्रीलंकेच्या अशोक वनातून श्रीरामाच्या पवित्र पादुका घेऊन अयोध्या येथे जात असताना या पादुका श्री साईबाबांच्या पवित्र साईनगरीमध्ये 27 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता येत असून भाविकांनी या श्रीरामाच्या पवित्र पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शिर्डीतील भुमीपुत्र सुदर्शन या हिंदूत्ववादी चॕनेलचे चेअरमन श्री सुरेश चव्हाणके यांचा मुलगा चि.प्रदोष हा व त्याचे सोबत काही सहकारी यांचेसमवेत अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभु श्रीराम मंदिराचे जिर्णोद्धार व मूर्तीची प्राणप्रतिष्ठे निमित्ताने प्रभु श्रीराम यांचे नावाने पादुका घेऊन थेट श्रीलंका येथील अशोक वनातुन अयोध्या येथे प्रभु श्रीराम ज्या ठिकानाहुन आले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

त्या ठिकाणाहुन पादुका घेऊन येत आहे.परंतु शिर्डी व परिसर येथे चव्हाणके परिवाराचे जन्मगाव गाव व कर्मभुमी असल्याने तसेच साईबाबांचे स्थान असल्याने याठिकाणी पादुका 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वा. येत आहे. श्रीरामाच्या या पवित्र पादुकांची शिर्डीत स्वागत व मिरवणुकीत सामील होण्यासाठी सुदर्शन चॅनलचे चेअरमन सुरेश चव्हाणके हेही येथे येणार आहेत. तरी या पवित्र श्रीरामाच्या चरण पादुकाचे स्वागत व दर्शन घेण्यासाठी तसेच खंडोबा मंदिर ते 16 गुंठे शताब्दी मंडप पर्यत भव्य मिरवणूकीत सामिल होण्यासाठी हजर रहावे. हा मोठा योग जुळून आला आहे.
आपण भाग्यवान ठरणार आहोत.आपण पुजन केलेल्या व दर्शन घेतलेल्या पादुका अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी असणार आहे. त्यामुळे कुटूंबातील प्रत्येक सदस्यांनी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत पादुका पुजन व दर्शनासाठी घेऊन यावे.
तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button