Letest News
साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा
राजकीयशिर्डी

प्रशासन–पोलीस–संस्थान टिमवर्कचा विजय-शिर्डीत शिस्तबद्ध आणि ऐतिहासिक नियोजन-✍️ कमलाकर कोते शिवसेना जिल्हा प्रमुख

शिर्डी | विशेष प्रतिनिधी –
श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या पुण्यनगरी शिर्डीत यंदाच्या नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने अभूतपूर्व गर्दी झाली. मागील सर्व वर्षांचे नाताळी गर्दी व देणगीचे विक्रम मोडीत काढत, यंदा शिर्डीत साईभक्तांनी नवा इतिहास रचला. साईबाबांविरोधात नकारात्मक प्रचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही मंडळींना, “सबकुछ साईबाबा आहेत, तेच भक्तांचे तारणहार आहेत” हा संदेश या विक्रमी गर्दी व दानातून संपूर्ण जगाला मिळाला, असेच म्हणावे लागेल.
🙏 साई संस्थान, प्रशासन व पोलिसांचे उत्कृष्ट नियोजन
श्री साईबाबा संस्थानच्या त्रिसदस्य समितीच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सत्र न्यायालयाच्या अध्यक्ष मा. मंजू शेंडे (सोनटक्के), जिल्हाधिकारी पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने उत्तम नियोजन केले. यास जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय अधिकारी मानिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे यांनी खंबीर साथ दिली. साईबाबा संस्थानचे कर्मचारी व पोलीस दलाने केलेले नियोजन निश्चितच कौतुकास्पद ठरले.
🚔 शिर्डी पोलिस, नगरपरिषद व यंत्रणांचा आदर्श सहभाग
शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय अधिकारी आमोल भारती, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, वाहतूक शाखेचे प्रभारी निरीक्षक महेश येसेकर यांनी शिस्तबद्ध नियोजन राबवले. शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता, पाणीपुरवठा व कर्मचारी पथक सतत सक्रिय होते. शिर्डीकर ग्रामस्थ, तरुण कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी भाविकांना मदत करून सामाजिक कर्तव्य पार पाडले.
🌿 सीईओ गोरक्ष गाडीलकर यांचे सकारात्मक नेतृत्व
मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शिर्डीत रुजू झाल्यापासून सकारात्मक व ठोस कार्य करत संस्थानच्या प्रतिमेला नवा आयाम दिला. साईबाबांविरोधातील बदनामीला आळा घालण्यासाठी त्यांनी स्वतः पोलीस तक्रारी दाखल केल्या, भक्तांशी थेट संवाद साधून सुधारणा केल्या, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले व कामचुकारांना शिस्त लावली. सोशल मीडिया प्रभावीपणे सक्रिय करत, पादुका दर्शन सोहळा देशभर यशस्वी केला. साध्या मिस कॉलचीही दखल घेणाऱ्या त्यांच्या कार्यपद्धतीला साईभक्तांकडून भरभरून पावती मिळत आहे.
🏥 आरोग्यसेवा, सेल्फी पॉईंट आणि बदलणाऱ्या शिर्डीचा नवा चेहरा
विक्रमी गर्दीच्या काळात श्री साईबाबा हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने सुमारे दहा हजार भाविकांवर उपचार केले. डॉ. प्रीतम वडगावे व त्यांच्या सहकाऱ्यांचे योगदान मोलाचे ठरले. साईंच्या जीवनावर आधारित उभारलेला सेल्फी पॉईंट व साई मंदिरासमोरील गार्डन परिसरातील निवांत वातावरण, बदलणाऱ्या शिर्डीचा नवा आणि सकारात्मक चेहरा अधोरेखित करत होते.
🌼 सकारात्मकतेचा विजय; साईमहिमा अढळ
या सर्व कामांना प्रोत्साहन व पाठबळ देणारे शिर्डी मतदारसंघाचे प्रतिनिधी मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील व मा. खा. सुजयदादा विखे पाटील यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. कुणाचा उदोउदो करण्याचा हेतू नसून, चांगल्या कार्याची दखल घेणे हाच शिर्डीकरांचा स्वभाव आहे—हीच साईबाबांची शिकवण आहे.
कुणी काहीही म्हणा, श्री साईबाबांचा महिमा चंद्र-सूर्य असेपर्यंत अखंड राहणार असून, नकारात्मक विचार करणाऱ्यांनी या विक्रमी भक्तीचा बोध घ्यावा, अशी भावना व्यक्त होत आहे.
✍️ कमलाकर कोते
शिवसेना जिल्हा प्रमुख, अहिल्यानगर (शिर्डी)

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button