Letest News
स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची मोठी कारवाई 120 किलो 905 ग्रॅम वजनाचे गांजासह एकुण 80,83,464/- रुपय... पत्रकारीता क्षेत्रात शौकतभाई शेख म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्... मागील भांडणाच्या कारणावरून एका कुविख्यात गुंड्याने केले गोळीबार श्रीरामपूर शहर हादरले  थायलंड येथे झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धा मध्ये शिर्डी चा निलेश वाडेकर याने मिळवले ब्रांझ मेडल कोट्यावधिचे मुद्देमाल जप्त करत नगर गुन्हे अन्वेषण पथकाने केली कामगीरी भारी !! शरद पवारास जिल्हाधिकारी साहेबांचा चांगलाच हिसका ! शेतकऱ्याचा चोरीस गेलेला जेसीबी मोठया शिताफिने हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई कोयता व सुऱ्याचा धाक दाखवुन लुटमार करणाऱ्या दोन टोळयांमधील 4 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद शिर्डी वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून कारवाई पोलीस निरीक्षक महेश येसेकर देह व्यापार रोखण्यासाठी पोलिसांनी केले चार हॉटेल सील हॉटेल् सील झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ
Blog

श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून झाली

शिर्डी :-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने मंगळवार दिनांक २३ ऑक्‍टोबर पासून सुरु असलेल्‍या श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून झाली.
आज उत्‍सवाच्‍या सांगता दिनी पहाटे ०५.१५ वाजता काकड आरती, त्‍यानंतर पहाटे ०५.४५ वाजता श्रींचे मंगल स्‍नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली. सकाळी ०७.०० वाजता संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्नी सौ.सुप्रिया यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा व गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्‍यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.प्रभंजन भगत यांचे गोपाळ काल्‍याचे कीर्तन झाले. काल्‍याच्‍या कीर्तनानंतर समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, कर्मचारी, साईभक्‍त व ग्रामस्‍थ उपस्थित होते. त्‍यानंतर दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. सायंकाळी ०६.०० वाजता श्रींची धुपारती झाली. रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत श्री रविराज रघुवीर नर, मुंबई यांचा अवघा रंग सुरांचा हा कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर संपन्‍न होईल. रात्रौ ०९.१५ श्रींची गुरुवार नित्‍याची पालखी मिरवणूक होऊन रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल.


श्रींच्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्‍यात आलेल्‍या भिक्षा झोळीत ग्रामस्‍थ व साईभक्‍तांनी भरभरुन दान दिले. यामध्‍ये गहु, तांदुळ ज्‍वारी व बाजरी असे सुमारे १४३ पोते धान्‍यरुपाने आणि गुळ, साखर व गहु आटा आदींव्‍दारे ०४ लाख ३५ हजार ९६५ रुपये व रोख स्‍वरुपात रुपये ६९ हजार ४२१ रुपये अशी एकूण ०५ लाख ५ हजार ३८६ रुपये इतकी देणगी भिक्षा झोळीव्‍दारे प्राप्‍त झाली. तर उत्‍सवकाळात सुमारे ०२ लाख साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. तर ०२ लाख १ हजार २४६ लाडू प्रसाद पाकीटांचा साईभक्‍तांनी लाभ घेतला. याबरोबरच श्री साईप्रसादालयात सुमारे ०१ लाख ८० हजार साईभक्‍तांनी मोफत प्रसाद भोजनाचा व अल्‍पोहार म्‍हणून ४७ हजार २१८ अन्‍नपाकीटांचा साईभक्‍तांनी लाभ घेतलेला आहे.

kamlakar


हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिद्धराम सालीमठ व मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे. सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button