Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
अ.नगरशिर्डी

शिर्डी भिक्षेकरी मुक्तीसाठी प्रशासनाकडून धरपकड मोहीम

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी शहरात बेघर भिकाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने स्थानिक नागरीकासह साईभक्त भाविकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता भिक्षा प्रतिबंधक कायदा १९५९ नुसार भिक्षा मागणी गुन्हा आहे असे असतानाही कारवाई मध्ये सातत्य नसल्याने शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणावर भिक्षेकरी वाढत असतात ४६ पुरुष वयोवृद्ध भिक्षेकरांना शिर्डी पोलीस साईबाबा संस्थान व शिर्डी नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

२४ डिसेंबर रोजी सकाळी मोठी कारवाई करून ३४ भिक्षेकरी पुरुष बारा महिला अशा ४६ जणांना ताब्यात घेऊन त्यांना शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले त्या ठिकाणी त्यांची वैद्यकीय चाचणी करून भोजन दिल्यानंतर राहता न्यायालयासमोर हजर करून न्यायालयाच्या आदेशानुसार भिक्षेकरी ग्रहांमध्ये पाठवले जाणार आहे शिर्डी शहरामध्ये काही टोळ्या तर महाराष्ट्रातील विविध रेल्वे स्थानकावर असलेले ७५ टक्के अपंगत्व असणारे वजनाने हलके असणारे पाठीवर घेऊन सहजपणे भिक्षा मागण्यासाठी वापर करता येईल

असे भिक्षेकरी शोधून थेट रेल्वेने आणले जाते जास्त भिक्षा मिळेल दोन टाईम जेवन व सर्व व्यसनासाठी मदत केली जाईल असे सांगुन शोधून शिर्डीत आणून त्यांच्याकडून भिक्षा मागण्याची काम करणारे देखील महिला आहेत जर कामात कामचुकारपणा केला तर मध्यरात्री चोप देखील दिला जातो भिक्षा मागताना काही महिला बारीक लक्ष ठेवून असतात जर मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी अटकाव केला तर सामुहीक गोंधळ करत कसा


अन्याय होतो हे दाखवण्यात देखील हि मंडळी पटाईत आहे भिक्षेत येणारी चिल्लर घेणारे देखील काही ठराविक लोक आहे निरक्षर असल्याने १हजाराची चिल्लर असेल तर सातशे रुपये सागितले जातात चोरावर मोर होणारे देखील भिक्षेत देखील हातचलाखी करणारे काही महाभाग शिर्डीत आहे तर काही या लोकाचे पैसे व्याजाने फिरवणारे देखील अनेक जण आहेतसाईबाबा मंदिर परिसर भोजनालय द्वारकामाई १६ गुंठे परिसर या ठिकाणी काही भिक्षेकरी केविलवाणा

चेहरा करून भीक मागतात तर कोणी पाठीवर झोळीत लेकरू घेऊन मंदिराच्या परिसरात भिक्षा मागत फिरतात तर काहीजण मुलगा आजारी आहे दवाखान्यात जायचे आहे आम्ही उपाशी आहोत असे भावनिक संवाद करून भिक्षा मागताना दिसून येतात साईभक्तांची अल्पकालीन संवेदनशीलता शिर्डी शहरात भिक्षेकरी वाढण्याचे मोठे कारण आहे

शिर्डी शहरात विशिष्ट अशा चार चाकी वाहनातून भिक्षेकरी आणले जातात व रात्री उशिरा एकाच वाहनातून घरी देखील सोडले जातात तर काही भिक्षेकरी रात्रीच्या वेळी मिळेल त्या ठिकाणी झोपी गेलेले दिसून येतात यात शिर्डी बसस्थानकाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो मोठ्या प्रमाणावर भिक्षेकरी असताना कारवाईत मात्र फारसे न सापडल्याने हि कारवाई अशीच चालू ठेवली पाहिजे असा नागरिकाचा सुर आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button