Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
क्राईमशिर्डी

शिर्डी येथून सराफ व्यापा-याचे चोरी झालेले सोने स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त

शिर्डी प्रतिनिधी फिर्यादी विजयसिंह वसनाजी खिशी, वय 35, धंदा सोने व्यापारी, रा.आवाल घुमटी, ता.अमिरगढ, जि.बनासकाटा, गुजरात हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून ते शिर्डी, श्रीरामपूर, कोल्हार, सोनई व अहिल्यानगर येथील सराफ व्यावसायिकांकडे सोने विक्रीसाठी आले. दि.13/05/2025 रोजी फिर्यादी व त्याचा ड्रायव्हर सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित रा.चौहटन, जि.बारमेर, राजस्थान

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

असे शिर्डी येथील हॉटेल साई सुनिता येथे मुक्कामी असताना ड्रायव्हरने 3,26,00,000/- रू किंमतीचे दागीने व रोख रक्कम चोरून घेऊन गेला.याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं.532/2025 बीएनएस कलम 306, 316 (2) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल आहे.

 स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, संतोष लोढे, अरूण गांगुर्डे, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक नेमुण चोरीचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.









































तपास पथकाने घटनाठिकाणी भेट देऊन, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयातील निष्पन्न आरोपीचा पुणे, मुंबई येथे शोध घेतला.परंतु आरोपी हा त्याचे मुळ गावी इब्रे का ताला, ता.चोहटन, जि.बारमेर, राजस्थान येथे गेल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने राजस्थान येथे जाऊन  सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित रा.चौहटन, जि.बारमरे, राजस्थान (फरार) याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.























पथकाने आरोपीचे नातेवाईकांना विश्वासात घेऊन गुन्हयाचे गांभीर्य समजावून सांगुन आरोपी व गुन्हयातील मुद्देमालाबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास कळविणेबाबत सांगीतले. 
























दि.23/05/2025 रोजी आरोपीचा भाऊ रमेशकुमार भुरसिंह राजपुराहित, वय 33, रा.इब्रे का ताला, ता.चोहटन, जि.बारमेर, राजस्थान हा स्थानिक गुन्हे शाखेत हजर होऊन त्याने गुन्हयातील मुद्देमाल हजर करत असलेबाबत कळविले.पथकाने पंचासमक्ष त्याचेकडे विचारपूस केली असता आरोपी सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित याने दि.21/05/2025 रोजी शिर्डी येथून चोरून आणलेले सोन्याचे दागीने बॅगमधुन आणुन घरी ठेवले











































 व तो कोठेतरी निघुन गेल्याची माहिती दिली. पंचासमक्ष रमेशकुमार भुरसिंह राजपुराहित याने हजर केलेले 2,50,59,103/- रू किंमत त्यात 2687.361 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध प्रकारचे दागीने (एसएनपी नग, टॉप्स, डुल, बाळी, मंगळसुत्र वाटया, लेडीज रिंग, राजमुद्रा रिंग) असा मुद्देमाल जप्त केला.गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदर कारवाई  सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, व.शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button