Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
अ.नगरशिर्डी

श्री साईनाथ रुग्‍णालयात अद्यावत आर्थोपेडीक शस्‍त्रक्रिया विभागाचा लोकार्पण सोहळा संपन्‍न

श्री. साईनाथ रुग्‍णालयातील नविन अद्यावत आर्थोपेडीक शस्‍त्रक्रिया विभागाचा लोकार्पण सोहळा आज दि. २४ ऑक्‍टोबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. श्री साईनाथ रुग्‍णालय (२०० रुम) येथे श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से व देणगीदार साईभक्‍त श्री गोविंददास दम्‍मानी, श्रीमती अंजु दम्‍मानी, यांच्‍या हस्‍ते पार पडला. यावेळी मोना दम्‍मानी, रचना दम्‍मानी, अशिष दम्‍मानी, कमलकुमार तापुरीया, शारदा तापुरीया, अभिषेक तापुरीया, स्‍नेहा तापुरीया, अमेय तापुरीया, झरना तापुरीया आदी उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


देणगीदार साईभक्‍त श्री गोविंददास दम्‍मानी व श्रीमती. अंजु दम्‍मानी यांनी श्री साईनाथ रुग्‍णालयात येथे नविन अद्यावत आर्थोपेडीक शस्‍त्रक्रिया विभागासाठी सुमारे १.५ कोटी रुपये देणगी दिलेली असुन त्‍यातुन श्री साईनाथ रुग्‍णालयात नविन अद्यावत आर्थोपेडीक शस्‍त्रक्रिया विभागाचे काम पुर्ण करणेत आले.


यावेळी बोलताना मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी सांगीतले की श्री साईबाबा संस्‍थानच्‍या दोन्‍हीही हॉस्पिटलचे उद्दिष्‍ट हे सर्वांना उत्‍कृष्‍ट आरोग्‍य सेवा मोफत व अत्‍यल्‍प दरात पुरविणे हे असुन श्री साईनाथ रुग्‍णालयात नाममात्र नोंदणी शुल्‍क घेवुन रुग्‍णांना मोफत उपचार केले जातात. दम्‍मानी परिवारासारखे दानशुर परिवारामुळे आम्‍हाला हे काम करताना मोठी मदत होत असते.

अद्यावत आर्थोपेडीक शस्‍त्रक्रिया विभागामुळे अनेक गोर गरीब रुग्‍णांच्‍या जीवनात बदल होईल. श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी साहेबांनी दम्‍मानी परिवाराचे आभार व्‍यक्‍त करुन त्‍यांचा सन्‍मान केला.
या प्रसंगी उप कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग श्री. संजय जोरी, , प्र.उप वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे, प्र.वैद्यकीय अधिक्षक डॉ.मैथिली पितांबरे, कार्यालय अधिक्षक प्रमोद गोरक्ष, आर्थोपेडीक सर्जन डॉ.विशाल पटेल, डॉ. गोविंद कलाटे, डॉ.विद्या बो-हाडे,

डॉ. महेंद्र नेमनाथ, डॉ. महेंद्र तांबे, डॉ.सत्‍यजीत निघुते, डॉ.प्रफुल्‍ल पोरवाल, डॉ.निर्मला गाडेकर, डॉ.पुजा सिंग, डॉ.पुनम वैष्‍णवी बांधकाम विभागाचे गणेश कोराटे, जनसंपर्क अधिकारी (रुग्‍णालये) सुरेश टोलमारे, बायोमेडीकल इंजिनिअर राजेश वाकडे, श्रद्धा कोते, तुषार कुटे प्रणाली कांबळे, अधिसेविका नजमा सय्यद, मंदा थोरात, यासह दोन्‍हीही हॉस्पिटलमधील डॉक्‍टर्स, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्‍तावीक डॉ. मैथिली पितांबरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सुरेश टोलमारे यांनी केले .

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button