Letest News
कामाच्या शोधात आलेल्या तरुणावर शिर्डीत रक्तरंजित हल्ला-पेरूच्या कारणावरून डोक्यात फळी घालून ठार मारण... EXCLUSIVE: भोंदू ‘कॅप्टन’चा आणखी एक कारनामा? साई संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्याची संशयास्पद आत्महत्या भोंदू लिंगपिसाट अशोक खरातचा काळा कारभार उघड — कोट्यवधींच्या जमीन हडपगुन्हा दाखल-दोघे ताब्यात दोघे फर... साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य...
क्राईमशिर्डी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच- शिर्डीत आश्रम पार्किंगमधून दुचाकी लंपास

शिर्डी : साईनगरीत मोटारसायकल चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून आता थेट आश्रम परिसरातूनच दुचाकी चोरीला जात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री साईबाबा आश्रम संस्थानच्या पार्किंगमधून एक मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


याबाबत फिर्यादी Subhash Radhu Dhav (रा. जोगेश्वरी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी यांनी आपली हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटारसायकल (क्रमांक MH-17-CU-4718) श्री साईबाबा आश्रम संस्थानच्या पार्किंगमध्ये सुरक्षिततेसाठी हँडल लॉक करून उभी केली होती. मात्र काही वेळाने ते परत आले असता पार्किंगमध्ये उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले.


या घटनेमुळे आश्रम परिसरातील पार्किंग सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून चोरीस गेलेल्या मोटारसायकलची अंदाजे किंमत सुमारे २० हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.


सध्या शिर्डी शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी आपली वाहने अधिक सुरक्षित ठिकाणी उभी करावी, तसेच लॉक व इतर सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार पोना गोसावी करीत आहेत. तपासावर प्रभारी पोलीस निरीक्षक गलांडे यांचे मार्गदर्शन आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button