Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
क्राईमशिर्डी

साईंच्या नगरीत तरुणाचा तरुणाई कडुन नशेत होणारे खुन गुन्हेगारीचे धक्कादायक वास्तव

शिर्डी प्रतिनिधी/   आहील्यानगर जिल्ह्यातील श्रेत्रफळ फार मोठे असताना पोलीस मनुष्यबळ फारच तोकडे असतांनाही कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे हे दोन सोमनाथ गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठी पराकाष्ठा करतांना दिसत असताना गुन्हेगारी रोखण्यात काही प्रमाणात जरी यश येत असली तरी ही जमेची  बाजू असली तरी सुद्धा तरुणाईला नशेचे साहित्य पुरवणाऱ्या लोकांना

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

व त्यांच्या नेटवर्कला उध्वस्त करण्याचे मोठे आव्हान  अहिल्या नगर पोलीस प्रशासनासमोर असल्याचे काही घटनेतून पुढे आले आहे   गेल्या काही वर्षाचा शिर्डीसह लगतच्या परिसराचा बारकाईने गुन्हेगारीचा अभ्यास केला तर खुणाच्या घटनेतील आरोपी हे कमी वयाचे असल्याची बाब पुढे आली आहे त्याबरोबरच त्या घटनेतील मयत देखील तीस वयोगटाच्या आतील असल्याचे दिसून येते पालकांचे होणारे दुर्लक्ष

डोक्यात असलेली भाईगिरीची हवा  विविध उपनगरात निर्माण झालेल्या गुन्हेगारांच्या टोळ्या त्यांना मिळणारा राजाश्रय हे या मागील प्रमुख कारण असले  तरी कमी  कष्टात सहजपणे मिळणारा बक्कळ पैसा  सायंकाळी हॉटेलमध्ये धाब्यावर. रात्री उशिरापर्यंत रेंगाळणारी तरुणाई अशा हॉटेल व धाब्यावर पोलिसांची न होणारी कारवाई  रात्री न होणारी नाकेबंदी विना नंबरच्या दुचाकी  याकडे देखील आता पोलीस प्रशासनाला लक्ष देत कठोरपणे कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे

जर कायद्याचा धाक निर्माण झाला नाही तर तरुणांचे होणारे हे खून रोखणार तरी कसे  अशा घटना मध्ये तरुणाईला सहजपणे येणारा राग ही खुणाचे कारण ठरत असले तरी व्यसनधीनता हे देखील महत्त्वाचे कारण ठरू पाहत आहे  विभक्त कुटुंबशैलीत धकाधकीच्या जीवनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना पालकांचे होणारे दुर्लक्ष देखील या समाज व्यवस्थेसाठी चिंताजनक बाब ठरू पाहत आहे असे असले तरी आपला मुलगा कोणाबरोबर फिरत आहे कोणाच्या सहवासात आहे या गोष्टीकडे देखील पालकांनी गंभीरपणे बघण्याची गरज आता महत्त्वाची ठरु पहात आहे

कमी असणारे पोलीस मनुष्यबळ. हे देखील यामागे महत्त्वाचे कारण ठरत असली तरी कमी मनुष्यबळात देखील पोलीस प्रशासनाला आपला धाक निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे जोपर्यंत अशा घटनेची गांभीर्य आपल्या जवळपासचा माणूस जात नाही तोपर्यंत लक्षात येत नाही पण ज्या घरातला तरुण अशा घटनेत मृत्युमुखी पडतात ते कुटुंब उघड्यावर आलेले असते त्याबरोबरच ज्या घटनेत ज्या कुटुंबातील आरोपी असतात त्यांना देखील अनेक संकटांना सामोरे जावे लागते

अशावेळी संपूर्ण कुटुंब देखील विस्कळीत होतो अनेक समस्यांना सामोरे जात असताना कुटुंब देखील उध्वस्त ठरते मात्र वेळ निघून गेलेली असती अशावेळी हे सर्व रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या बरोबरच सामूहिक ताकद देखील महत्त्वाची ठरते अशावेळी लोकप्रतिनिधींनी देखील अशा घटनांना आळा घालण्यासाठी निश्चितचपणे पुढाकार  घेतला पाहिजे

तरच गुन्हेगारीला आळा बसू शकतो मात्र तसे होताना दिसत नाही त्याची परिणीती अशा गुन्ह्यांन मध्ये होताना दिसत आहे शिर्डी असो की राहता कोपरगाव संगमनेर अकोले  श्रीरामपूर  या भागात मोठ्या प्रमाणावर होणारी अवैध दारूची विक्री  कुत्ता गोळी बंटा इंजेक्शन आदीसह विविध नश्याचे  साहित्य सहजपणे विकणारी मंडळी यांच्या अगोदर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई केली तर काही प्रमाणात का होईना अशा घटनांना आळा घालता येईल

त्याचे परिणाम देखील चांगले दिसून येतील पण त्यासाठी पोलीस प्रशासनाची इच्छाशक्ती महत्त्वाची ठरणार आहे त्याबरोबरच असे नशेचे साहित्य विकणाऱ्यांची माहिती जागरूक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे पोलिसांनी देखील माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून कारवाई केली तर खात्रीशीरपणे तरुणाईचे होणारे हे खून सहजपणे थांबू शकतात असा विश्वास आजही सामान्य माणसाला आहे

मात्र त्यासाठी हवी पोलिसांची इच्छाशक्ती व त्यासाठी हवी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पाठबळ व राजकीय मंडळीची साथ मिळाली तर हे सहजपणे थांबू शकते मात्र त्यासाठी इच्छाशक्तीची मोठी गरज आहे इतकेच म्हणता येईल

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button