Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईमशिर्डी

शिर्डीच्या मुखदर्शन हॉलमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास!

शिर्डी : श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलेल्या भाविक महिलेच्या गळ्यातील तब्बल ९४ हजार ७८० रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दि. २९ जुलै २०२६ रोजी दुपारी १.३० ते २.३० वाजेच्या सुमारास श्री साईबाबा समाधी मंदिरातील मुखदर्शन हॉलमध्ये घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मालेगाव येथील रेखा देविदास शिंदे (वय ५२) या आपल्या मुलगी कविता देविदास शिंदे हिच्यासोबत साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आल्या होत्या. मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी असल्याने दोघी गेट क्रमांक ३ येथील मुखदर्शनाच्या रांगेत उभ्या राहिल्या. काही वेळाने मंदिरात प्रवेश केल्यानंतरही प्रचंड गर्दी आणि लोटालोटी सुरू होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दर्शन घेतल्यानंतर मंदिराबाहेर येताना रेखा शिंदे यांच्या लक्षात आले की, त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण गायब झाले आहे. त्यांनी तत्काळ मुलगी कविताला याबाबत सांगितले. त्यानंतर दोघींनी आजूबाजूच्या परिसरात तसेच फरशीवर गंठण पडले आहे का, याचा शोध घेतला. मात्र, बराच शोध घेऊनही गंठण सापडले नाही.
त्यामुळे गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने गळ्यातील सोन्याचे गंठण चोरल्याची खात्री झाल्याचे महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये १७.२०० ग्रॅम वजनाचे, दोन पळ्या असलेले सोन्याचे मिनी गंठण, ज्याची अंदाजे किंमत ९४ हजार ७८० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


शिर्डीतील साईबाबा मंदिरात देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटना घडत असल्याने भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुखदर्शन हॉलसारख्या गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही यंत्रणेवर अधिक प्रभावी देखरेख आवश्यक असल्याची मागणी भाविकांकडून होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रेखा शिंदे यांनी कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button