Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरक्राईम

कोपरगावात,पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’ ?

राहाता तालुक्यातील १५ चारी येथील रहिवासी असलेल्या आरोपी असिफ युनूस पठाण याने कोपरगाव तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या महिलेला (वय-२५) आपली ओळख लपवून व फेसबुकवर ओळख करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी नुकताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.हे प्रकरणी,’लव जिहाद’आहे का असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातही लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.राज्यात लव्ह जिहादच्या विरोधात पन्नासहून अधिक मोर्चे निघाले.परंतु एक वर्ष उलटून गेल्यावरही कायदा झाला नाही.तर,उत्तर प्रदेश,हिमाचल प्रदेश,उत्तराखंड,हरियाणा,मध्य प्रदेश,गुजरात आदी राज्यांनी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा केला आहे.मात्र महाराष्ट्रात तो नसल्याने त्या विरोदहत गुन्हे वाढत चालले असल्याचे दिसत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”वर्तमानात ‘लव्ह जिहाद’ हा जिवंत विषय ठरला असताना व मागील काही वर्षात त्यावर देशभर रणकंदन झालेले असताना कोपरगाव तालुक्यात एक घटना उघडकिस आली आहे.यातील फिर्यादी विवाहित महिला ही आपल्या पतीसोबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी आहे.तिला एक अपत्य आहे.मोबाईलच्या जमान्यात तिची एक तरुणांसोबत फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती.त्यातून त्यांनी आरोपी याचे राहाता तालुक्यात एक चार चाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे.याने आपले मुस्लिम नाव असिफ युनूस पठाण (वय-३०) ही खरी ओळख लपवून,’नबा पाटील’ असे बनावट नाव धारण केले होते.व तो तिच्या संपर्क साधत होता.

दरम्यान तो प्रेमाच्या आणाभाका घेत होता.त्यातून त्याने सदर महिलेला आपण दि.०४ जूलै रोजी सकाळी ९.३० वाजता येत आहे.अशी खबर फोनवर दिली होती व त्यानुसार तो कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर महिलेच्या घरी गेला होता.त्यावेळी त्या महिलेचा एक छोटा मुलगा आणि ती असे दोघेच घरी होते.या संधीचा गैरफायदा उचलत त्याने तिच्या घरात प्रवेश करून फसवा मार्ग वापरून तिचे इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संभोग केला असल्याचा आरोप सदर फिर्यादी महिलेने आपल्या फिर्यादित केला आहे व या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी व पोलीस निरीक्षक वैशाली मुकणे आदिनी भेट दिली आहे.मात्र हा प्रकार 'लव्ह जिहाद' आहे का याबाबत आमच्या प्रतिनिधीने पोलीस अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी अद्याप तरी असा पुरावा हाती आला नाही अशी माहिती दिली आहे.मात्र या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आवाज उठविण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३७६/२०२४ भा.द.वि.कलम ३७६ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस पोलीस निरीक्षक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे या करीत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button