Letest News
मध्यरात्री दरोड्याने थरकाप-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाची दमदार कामगिरी – आंतरजिल... शिर्डीत ‘जमीन सौदा’ बॉम्ब फुटणार? भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या ५० कोटींच्या व्यवहारावर पोलिसांची ... पोटनिवडणुकीत माध्यमांवर कडक नियम-जाहिरातींसाठी पूर्व मंजुरी अनिवार्य नाशिक प्रकरणात खळबळ! भोंदू बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ – ‘५ नरबळी’चा धक्कादायक संशय शिर्डीतील ‘क्लासिक आइसक्रीम’ची जागतिक भरारीकडे वाटचाल-नूतन आइसक्रीम युनिटचे भव्य उद्घाटन   ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ  वाघचौरे यांना फसवण्याचा... सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक
अ.नगरशिर्डी

सूर्यकुमार यादव सपत्नीक शिर्डीत येत साईबाबांच्या चरणी

भारतीय T20 क्रिकेट संघाचा कर्णधार तथा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव आज 14 मार्च (शुक्रवार) रोजी धुळवडच्या पार्श्वभुमीवर सपत्नीक शिर्डीत येत साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आयपीएल सुरु होत असल्यानं दर्शनाला : भारतीय T20 क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवनं पत्नी देवीशा शेट्टी समवेत आज शुक्रवारी माध्यन्ह आरती पुर्वी शिर्डीत साईंच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. मागील दोन महिन्यापुर्वी देखील सूर्यकुमार शिर्डीत दर्शनासाठी आला होता.

त्यानंतर आता आयपीएल सुरु होत असल्यानं त्यानं साई बाबांचं दर्शन घेतलंय. आयपीएल सुरु झाल्यानंतर साई दर्शनासाठी येता येणार नसल्यानं आज सपत्नीक साईबाबांच्या दर्शनासाठी आल्याचं सूर्या म्हणाला. यावेळी सूर्यकुमार आणि पत्नी देविशानं साई बाबांच्या द्वारकमाई व गुरुस्थान मंदिरात जावून दर्शन घेतलं.

तसंच साई दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर दराडे यांनी सूर्यकुमारचं सपत्नीक शॉल आणि साईंची मूर्ती देवून सत्कार केला. शिवाय 22 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलसाठी सूर्यकुमार यादवला संस्थानच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी साई मंदिर प्रमुख विष्णू थोरात व जनसंपर्क प्रमुख तुषार शेळके उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button