Letest News
सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस साईबाबांची सायंकाळची आरती आता साडेसहा वाजता सूर्यास्ताच्या वेळेनुसार आरतीच्या वेळेत बदल १० सप्टेंबरप... साईबाबांच्या समाधी मंदिरातील दर्शन वेळेत बदल१० सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता दर्शन प्रक्रिया सुरू नुसते फोटो काढून श्रेय घेता येत नाही पत्रव्यवहार दाखवा!” — खासदार निलेश लंके यांचा सुजय विखेंना घणाघ... साईचरणी पुण्याच्या साईभक्ताची अनमोल भेट१२ लाख ८२ हजारांचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण पंढरपूरच्या विठ्ठल चरणी कमलाकर कोते यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त विठ्ठल-रखुमाईचे दर्शन परिस्थितीला पंक्चर करत साहिलची डॉक्टर होण्याकडे गरुडझेप! वडील पंक्चर काढतात मुलगा आता रुग्णांवर उपचा...
क्राईमशिर्डी

श्रद्धा सबुरी पतसंस्था घोटाळा : ४१.९७ कोटींचा गैरव्यवहार — ठेवीदार त्रस्त-कारवाईचा वेग थंड!

शिर्डी :
शिर्डीजवळील श्रद्धा सबुरी सहकारी पतसंस्थेत तब्बल ४१ कोटी ९७ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार उघड झाल्याप्रकरणी १५ मे २०२५ रोजी २१ संचालकांसह ६ कर्मचाऱ्यांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणाला आज जवळपास सात महिने उलटून गेले तरी ठेवीदारांच्या पैशांचे भविष्य अजूनही अनिश्चितच आहे.

sai nirman
जाहिरात

प्रशासक संजय पाटील यांची नियुक्ती, कर्जवसुलीला वेग

गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी सहकार खात्याने प्रशासक म्हणून संजय पाटील यांची नियुक्ती केली. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने कर्जवसुली मोहीम सुरू केली.
त्यांच्या चौकशीत पुढील माहिती समोर आली—

DN SPORTS

कर्ज वसुलीसाठी ३५० जणांना नोटिसा पाठवल्या

आगामी काळात आणखी नोटिसा देण्याची शक्यता

काही थकबाकीदार कर्ज भरण्यासाठी उपस्थित

सध्याच्या स्थितीत वसुलीची प्रक्रिया सुरु असली तरीही ठेवीदारांच्या पैशांचा प्रश्न पूर्ववतच आहे.

गोरगरीब ठेवीदारांचे पैसे अडकून, शेकडो कुटुंब हतबल

kamlakar

निमगाव कोराळे आणि पंचक्रोशीतील सहा गावांमधील—

शेतकरी

कामगार

सेवानिवृत्त कर्मचारी

लहान व्यावसायिक

अशा शेकडो ठेवीदारांचे लाखो–कोटी रुपये या पतसंस्थेतील गैरव्यवहारामुळे अडकून आहेत.
या ठेवीदारांपैकी अनेकांचे संपूर्ण आयुष्यभराचे कष्टाचे पैसे या पतसंस्थेत गुंतवलेले आहेत, आणि गैरव्यवहारामुळे ही रक्कम परत मिळेल की नाही याचीच भीती सर्वांच्या मनात आहे.

LCB तपासात आत्तापर्यंत ५ जणांवर कारवाई — पण संचालक अजूनही मोकाट?

या प्रकरणाचा तपास अहिल्यानगर LCB कडून सुरू आहे.
तपासातून आतापर्यंत —

३ कर्मचारी गजाआड

चेअरमन अटक

व्हाईस चेअरमन अटक

२१ पैकी काही संचालक मरण पावलेले असले तरी उर्वरित संचालकांवर कारवाईचा वेग कमी असल्याने ठेवीदारांमध्ये नाराजी आहे.

ठेवीदारांचा इशारा — “आमच्या कष्टाचे पैसे परत द्या!”

या प्रकरणातील कारवाई, तपासाचा वेग आणि ठेवीदारांना पैसे परत मिळण्याबाबत अंधार असल्याने काही ठेवीदारांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे—

उर्वरित संचालकांवर तत्काळ कारवाई करावी

गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करावी

अडकलेली रक्कम लवकरात लवकर परत द्यावी

याच मागण्यांसाठी ठेवीदार लवकरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांची भेट घेणार आहेत.
“आमच्या कष्टाची रक्कम परत मिळावी; हा न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे,” अशी मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button