Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरशिर्डी

shirdi saibabanews श्री साईबाबा मंदिर परिसरात १०८ फूट उंच राष्ट्रध्वजाचे लोकार्पण सोहळा संपन्न..

श्री साईबाबा मंदिर परिसरातील गेट क्रमांक ०१ जवळ “फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया” यांच्या देणगीतून उभारण्यात आलेल्या १०८ फूट उंच भव्य राष्ट्रध्वजाचा लोकार्पण सोहळा आज सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष व लोकसभा खासदार नवीन जिंदाल, शिर्डी लोकसभा खासदार भाऊसाहेब वाकचौरे व श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर (भा.प्र.से.)यांच्या हस्ते संपन्न झाले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या प्रसंगी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रज्ञा महांडुळे-सिनारे, विश्वनाथ बजाज, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे,कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे , संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, शिर्डी ग्रामस्थ, संस्थानचे विविध विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गोरक्ष गाडीलकर यांनी प्रास्ताविकातून ध्वजारोहणाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि खासदार नवीन जिंदाल यांनी आपले मनोगत व्यक्त करत, राष्ट्रप्रेम जागृत करणाऱ्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. फ्लॅग फाउंडेशनच्या वतीने लेफ्ट. कर्नल सुनील नरोला यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री साईबाबा महाविद्यालयाचे कांडेकर सर यांनी केले.

हा भव्य राष्ट्रध्वज मंदिर परिसरातील एक नवीन ऐतिहासिक पर्व सुरू करणारा प्रेरणास्रोत ठरणार असून, देशाभिमान आणि भक्तिभाव यांचा संगम साधणारा एक मानबिंदू म्हणून श्री साईभक्‍तांना प्रेरणा देत राहील.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button