Letest News
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ
क्राईमशिर्डी

सिन्नरचा दीपक लोंढे पोलिसांच्या रडारवर- २५ मालमत्तांची माहिती समोर!

राहाता : भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाचा वेग वाढत असताना, त्याचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा सिन्नर येथील दीपक लोंढे आता शिर्डी पोलिसांच्या रडारवर आला आहे. तब्बल दोन दिवस चाललेल्या कसून चौकशीत लोंढे यांनी खरातच्या सिन्नर तालुक्यातील २५ मालमत्तांची माहिती पोलिसांना दिल्याची मोठी माहिती समोर आली आहे. श्रीरामपूर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.
💣 समता पतसंस्थेतील कोट्यवधींचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात
दीपक लोंढे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर समता पतसंस्थेत चार खाती उघडून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचा गंभीर संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, या खात्यांमध्ये अशोक खरातची वारसदार म्हणून नोंद असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे अधिकच गडद होत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🕵️ ६-७ तासांची चौकशी; लेखी जबाब नोंद
शिर्डी पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर लोंढे शुक्रवारी दुपारी पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांची सलग ६ ते ७ तास चौकशी करत अनेक मुद्द्यांवर सखोल माहिती घेतली. शनिवारी त्यांनी आपला लेखी जबाब नोंदवला. चौकशीत लोंढे यांनी “राजकीय कुटुंब आणि खरातचा सिन्नरमधील मॉल यामुळे ओळख झाली, त्यानंतर येणे-जाणे वाढले,” असे सांगितले.
⚡ लोंढे यांचा पलटवार; “खाती आमची नाहीत, मला लक्ष्य केलं जातंय!”
चौकशीनंतर माध्यमांसमोर येताच लोंढे यांनी सर्व आरोप फेटाळले. “माझ्या आणि पत्नीच्या नावावरची समता पतसंस्थेतील खाती आमचीच नाहीत. कागदपत्रांवर आमच्या सह्या नाहीत. मोठ्या लोकांसोबत फोटो असल्यामुळे मला मुद्दाम लक्ष्य केलं जात आहे,” असा दावा त्यांनी केला.


🔥 राजकीय छटा आणि ‘व्हायरल’ कनेक्शन
“मी शेतकरी कुटुंबातील साधा माणूस आहे. आमचं कुटुंब राजकारणात असलं तरी मी स्वतः राजकारणात नाही. सोशल मीडियावर माझे फोटो व्हायरल होत आहेत, त्याबद्दल अंजली दमानिया यांचे आभार,” असा टोला लोंढे यांनी लगावला.
🚨 तपास अधिक गडद; पुढे काय उघड होणार?
खरातच्या आर्थिक साम्राज्याशी आणि जमीन व्यवहारांशी लोंढे यांचा नेमका संबंध काय, याचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार पुढील मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
👉 भोंदूगिरीपासून कोट्यवधींच्या व्यवहारांपर्यंत… खरात प्रकरणातील नवे धागेदोरे आता कोणत्या मोठ्या नावांपर्यंत पोहोचणार? 🔥

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button