Letest News
राहता शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत-सोहेल-अनिकेतच्या कथित गुटखा विक्रीला कोणाचा वरदहस्त? सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांचा निलेश लंकेंकडून पराभव! हजारो लेकींच्या डोक्यावर मायेचा हात ठेवणाऱ्या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड शिर्डीच्या सामाजिक राज... दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता!
शिर्डी

शिर्डी | देशभर उभारली जाणार साईबाबांची सेम-टू-सेम मंदिर..

साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसारासाठी साई संस्थानकडून देशभर साई मंदिर उभारणीचे विचाराधीन आहे. याकरीता एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे साई संस्थान शिर्डी सारखेच मंदिर उभारणार आहे.

शिर्डी: साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसारासाठी साई संस्थानकडून देशभर साई मंदिर उभारणीचे विचाराधीन आहे. याकरीता एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे साई संस्थान शिर्डी सारखेच मंदिर उभारणार आहे. याशिवाय तेथे रुग्णालय, अन्नदान आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. याशिवाय गावोगावी नव्याने उभारण्यात येणार्‍या साईबाबांच्या मंदिरांचे बांधकामासाठी पन्नास टक्के रक्कम अथवा 50 लाखापेक्षा जी रक्कम कमी आहे ती रक्कम मदत करण्याचा साई संस्थान विचार करत असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी दिली.

sai nirman
जाहिरात

श्रीसाई मंदिर निर्माण धोरण – श्री साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसारासाठी श्रीसाई संस्थानकडून देशभर श्रीसाई मंदिर उभारणीचे विचाराधीन आहे. याकरीता एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे श्रीसाई संस्थान शिर्डीसारखेच मंदिर उभारणार आहे. याशिवाय तेथे रुग्णालय, अन्नदान आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. याशिवाय गावोगावी नव्याने उभारण्यात येणाऱ्या श्री साईबाबांच्या मंदिरांचे बांधकामासाठी पन्नास टक्‍के रक्‍कम अथवा 50 लाखापेक्षा जी रक्‍कम कमी आहे ती रक्‍कम मदत करण्याचा श्रीसाई संस्थान विचार करत आहे.

डोनेशन धोरण  – यापुढे भाविक ज्या प्रमाणात देणगी देतील, त्याप्रमाणात त्यांना वर्षभर ठराविक दिवशी आरती व दर्शनाची सुविधा संस्थानकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी श्रीसाई संस्थान युनिक आयडी कार्ड बनवणार आहे. यापूर्वी श्रीसाई समाधीवर शाल पांघरण्यासाठी सोडत पद्धत अवलंबिण्यात येत होती. आता यातही मोठ्या देणगीदारांना ही संधी उपलब्ध करून देण्याबाबत श्रीसाई संस्थानने प्राथमिक प्रस्‍ताव तयार केलेला आहे.

DN SPORTS

श्रीसाई मंदिर असोसिएशन धोरण– जगभरातील व देशभरातील श्रीसाई मंदिरांची असोसिएशन स्थापन करण्याबाबतही श्रीसाई संस्थानचा विचार सुरू आहे.

उपरोक्‍त धोरणांबाबतची माहिती संस्‍थानचे www.sai.org.in या अधिकृत संकेतस्‍थळावर देण्‍यात आलेली आहे. या तिन्‍ही धोरणांबाबत भाविक व ग्रामस्थांच्‍या सूचना ceo.ssst@sai.org.in या ई-मेलवर मागवण्यात येत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button