शिर्डी प्रतिनिधी राजस्थान येथील साईभक्त आशियाना उत्सव भिवाडी राजस्थान येथुन शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शना साठी आलेल्या मंजू सचदेव सोबत त्यांची बहिण किरण सुनिल ग्रोवर, आणि पुजारी श्यामसुंदर असे सकाळी 09/00 वा चे सुमारास निघाले व सायंकाळी 05/00वा चे सुमारास शिर्डी येथे पोहचले व साईधाम आश्रम येथे वास्तव्यास थांबले होते.
दि. 19/06/2025 रोजी सकाळी 08/45 वा. चे. सुमारास फिर्यादी व सोबत किरण सुनिल ग्रोवर, आणि श्यामसुंदर असे आम्ही श्री साईबाबा यांचे दर्शनासाठी मंदिरात गेलो त्यावेळी माझे सोबत असलेल्या बहिण किरण सुनिल ग्रोवर हिचे जवळ काळ्या रंगाचे पर्स होती त्यामध्ये रोख रक्कम दोन लाख रुपये ठेवले होते.
आम्ही दर्शन करुन मंदिराच्या बाहेर आलो व चार नं. गेटचे जवळ लाडु काऊंटर होते तेथे लाडु घेण्यासाठी गेलो असता तेथे पैसे काढण्यासाठी मी बहिणी जवळील काळ्या रंगाची पर्स ची चैन उघडली असता मला पर्स ही रिकामी दिसली त्यावेळी मी पर्स ची ऊचका पाचक करुन बघितली असता मला पर्सला खालुन कापलेले दिसले
त्या नंतर आम्ही तेथे आजुबाजुला पर्स मधिल पैशांचा शोध घेतला असता मिळुन आले नाहीत. त्यावेळी आम्ही श्री साईबाबा संस्थांचे ऑफिस मध्ये जाउन तक्रार केली असता तेथे आम्हाला CCTV कॅमेरे दाखवीले त्यात मी श्री साईबाबांचे समाधी पाशी दर्शन घेत असताना तेथे आमचे पाठिमागुन पाच ते सहा ईसम आले
त्यात एक महिला होती त्यांनी पैसै काढल्याचे व त्यांचे खिशात टाकताना ते दिसत आहेत. अशी फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल केली पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत