Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
Blog

कोपरगाव येथील जेऊर पाटोदा परिसरात महसूल विभागाच्या खाजगी वाहनाने अपघात,चौघे जखमी

कोपरगाव( प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथे महसूल पथकाच्या खाजगी वाहनाचा अपघात होऊन चौघेजण जखमी झाले आहेत.
महसूल पथकाच्या खाजगी वाहनाचे दार आतमधून अचानक उघडल्याने पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात पती पत्नी आणि एक लहान मुलासह एक मुलगी असे चौघे जण जखमी झाले आहे. सदरची घटना कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा हद्दीत शनिवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली असून घटना घडल्यानंतर महसूल पथक वापरत असलेल्या खाजगी वाहनातूनच जखमींना धारणगाव रोडवरील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


चालत्या वाहनाचे दार उघडल्याने सदर अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि जखमींच्या नातेवाईकांनी म्हटले असुन महसूल पथकात असलेले तलाठी यांनी मात्र उभ्या असेलेल्या गाडीचे अपघात झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी रूग्णालयात पोहचून जखमिंची विचारपूस केली आहे.


सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास चांडे कुटुंब हे देवीच्या दर्शनासाठी जात असताना इर्टिगा वाहनाला लागलेल्या धडकेत चौघे जखमी झाल्याची घटना जेऊरपाटोदा शिवारातील घरकुल वसाहत कोकणीआईच्या मंदिराजवळ घडली. याबाबतीत नागरिकांतून मिळालेल्या माहितीनुसार विलास चांडे हे आपल्याकुटुंबासमवेत देवीच्या दर्शनाला जात असताना प्रांत कार्यालयाचे पथक हे जेऊरपाटोदा शिवारातील घरकुल येथे आले असता वहान चालू अवस्थेत असताना गाडीचे दरवाजा उघडला असता मागून येणारी मोटारसायकल दाराला धडकून त्यात विलास चांडे वय अंदाजे 40 वर्ष सोनाली चांडे, एक १५ वर्षाची मुलगी आणि 2 वर्षाचा मुलगा हे चौघे जखमी झाले आहे. सदर वाहनात नायब तहसिलदार भामरे,तलाठी सुशील शुक्ला, अव्वल कारकून, शुल्लेश्र्वर इज्गे आणि खाजगी चालक बाळू हे होते.

kamlakar


याबाबत अधिक माहिती अशी की सध्या कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर महसूल पथक कामाला लागले आहे शनिवारी दुपारच्या सुमारास प्रांत अधिकारी यांचे पथक कोपरगावात अवैध गौण खनिज उपसा करणाऱ्यांवर कारवाई करत असताना सदरचा प्रकार घडला आहे. दरम्यान जखमींना रुग्णालयात सोडून सदरील वाहन चालक खाजगी वाहन घेऊन निघून गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. ग्रामस्थांनी महसूल पथकाला घेरले यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान सदरील खाजगी वाहन चालक वाहन घेउन का निघून गेला? वाहनाचा दरवाजा आत मधून कोणी उघडला? सदर प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का? जखमी झालेल्या गरीब कुटुंबाला न्याय मिळणार का? असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button