Letest News
अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त  भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर- शिर्डीत 20 जूनला आंदोलन ‘एक पीडित बहीण-सोबतीला लाखो हिंदू’- शिर... साई संस्थानमध्ये ‘शिस्तीचा बुलडोझर’ CEO गोरक्ष गाडीलकर ॲक्शन मोडमध्ये नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थ... मोहरम सण शांतता-सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया ऑपरेशन टायगर नव्हे टायगरला आधी दात हवेत!"शिर्डीत खासदार अरविंद सावंत यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीक... "मी तिला मारलंय…" मित्राला केलेला फोन ठरला घातक खुनाचा पर्दाफाश-श्रीगोंदा हादरला! तरुणीचा खून करून प... श्रीरामपुरात कट्टा-काडतुसांसह दोन जण जेरबंद पोलिसांच्या संयुक्त कारवाईने मोठा अनर्थ टळला "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव- पोलिस दलात संताप "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव-पोलिस दलात संताप साईनगरीत मानवतेचा संदेश-विखे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साईनाथ रुग्णालयात फळवाटप
शिर्डी

श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता राजेंद्र सुभाष कोते यांच्‍या हस्‍ते दहिहंडी फोडण्यात आली

शिर्डी :-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने शनिवार दिनांक २० जुलै २०२४ पासून सुरु असलेल्‍या श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता आज ह.भ.प. श्रीमती वेदश्री वैभव ओक, डोंबिवली यांच्‍या किर्तनानंतर दहिहंडी फोडुन झाली.
आज उत्‍सवाच्‍या सांगता दिनी सकाळी ०६.५० संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली. सकाळी ७.०० वा गुरुस्‍थान मंदिरात संस्‍थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व सौ. मालती यार्लगड्डा यांच्‍या हस्‍ते रुद्राभिषेक करण्‍यात आला. सकाळी १०.०० वाजता सुरु झालेल्‍या काल्याच्‍या किर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्‍त तात्‍या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्‍य श्री राजेंद्र सुभाष कोते यांच्‍या हस्‍ते दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे,प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्‍यानंतर १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत श्रीमती वनिता बजाज, दिल्‍ली यांचा साईभजन कार्यक्रम झाला. दुपारी ०४.०० ते ०६.०० या वेळेत श्री विरेंद्रकुमार, साई ब्रदर्स, प्रयागराज यांचा मनोहारी भक्‍तीमय भजनांचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत श्री. ग्‍यानेश वर्मा, मुंबई यांचा साईराम गुणगान कार्यक्रम होईल. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल.
हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी श्री.सिध्‍दाराम सालीमठ व मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, विश्‍वनाथ बजाज, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, सर्व विभागप्रमुख व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button