Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
क्राईमशिर्डी

शिर्डीत दारुड्याने रस्त्यावर ठाण मांडत चक्क केले मोठे काम! पोलिसांसमोर केला रस्ता जाम!

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी हे श्री साईबाबांमुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून येथे 1987 सालापासून दारूबंदी करण्यात आलेली असतानाही येथे अवैधरित्या दारू विक्री होत आहे. शिर्डी व परिसरात अवैध मोबाईल मटका, जुगार, अवैध भिशी असे अनेक अवैध व्यवसाय सुरू आहेत. यामध्ये कहर म्हणजे शिर्डीत रविवारी एका दारुड्याने थेट रस्त्यावर ठाण मांडून पोलिसांसमोर ट्रॅफिक जाम केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

असा हा दारुड्याचा प्रताप पाहून सर्व आवाक झालेच परंतु साई भक्तांची वाहने बराच वेळ थांबल्यामुळे साई भक्तांनाही मोठी अडचण त्यामुळे निर्माण झाली. असे अनेक प्रकार शिर्डीत होत असतात. शिर्डीत दारुडे एकमेकांना साई भक्तांसमोर शिवीगाळ करतात. आपापसात हाणामाऱ्या करतात. त्यामुळे साई भक्तांना विशेषतः महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

शिर्डी मध्ये 1987 पासून दारूबंदी आहे. मात्र तरी शिर्डीत अवैधरित्या दारू विक्री मोठ्या तेजीत सुरू आहे. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र शिर्डीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रंणजीत गलांडे शिर्डीत रुजू झाले व त्यांनी पहिल्या दिवसापासून अवैध धंद्यांवर येथे धाडसत्र सुरू केले आहे.

त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. मात्र वरिष्ठांनीही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिर्डीत देश-विदेशातून साईभक्त येत असतात. मात्र येथे गांजा चरस ओढणारे दारू पिणारे हे रस्त्यावर दिसत असतात. आपापसात शिवीगाळ करत असतात. त्यामुळे साई भक्तांना त्रास होतो. येथे अनेक अवैध व्यवसाय गुपचूप पणे सुरू आहेत.

शिर्डी व परिसरातील गावांमध्ये मोबाईलवर मटका तेजीत सुरू आहे. सर्वांना मोबाईलवर मटका सुरू असल्याची माहिती आहे .मात्र अशा मटक्यांवर कोणी ॲक्शन घेत नाही. पोलिसांनी संशयित मटका चालवणारे व खेळणारे यांचे मोबाईल तपासून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे.

अनेक ठिकाणी जुगार अड्डे आहेत. पत्त्याचे क्लब चालवले जातात. या अवैद्य धंद्यातून मोठे पैसे कमवले जातात. व त्यातूनच गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. खूण होण्यापर्यंत या गुन्हेगारांची मजल गेली आहे. शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये आता अवैध धंदे वाढू लागले आहेत.

शिर्डी सह परिसरात अवैध व्यवसाय तेजीत आहेत. शिर्डीसह परिसरात मटका, जुगार, क्लब, अवैध दारू विक्री, अवैध भिशी, अवैध वेश्याव्यवसाय, अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एखादी दुसरी धाड टाकली जाते. मात्र परत सर्रास हे अवैध व्यवसाय सुरू होतात. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती शिर्डी व परिसरात वाढत असून गुन्हेगारी टोळ्या फोफावत आहेत.

एक दारुड्या रस्त्यामध्ये ठाण मांडून ट्राफिक जाम करतो. तेही पोलिसांसमोर करतो. हे पोलिसांना आव्हान नाही का? अशी चर्चा आता वाहनधारक व नागरिकांमधून होत आहे. शिर्डीमध्ये दारू विक्री बंद असताना दारू मिळते कुठून? असा प्रश्न तयार होतो.शिर्डीतही अवैध धंदे तेजीत आहेत. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी याकडे लक्ष देत नाही.

शिर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रंणजीत गलांडे मात्र दररोज अवैध धंद्यांवर धाडी टाकत आहेत. मग वरिष्ठ अधिकारी फक्त नावापुरते किंवा प्रसिद्धीसाठी गाजावाजा करण्यापूरते आहेत की काय? असाही सवाल नागरिकांकडून होत आहे.

शिर्डी व परिसरातील अवैध दारू धंदे करणारे अवैध व्यवसाय करणारे यांच्यावर 93 अंतर्गत प्रस्ताव पाठवून त्यांना तडीपार केले पाहिजे. तेव्हा शिर्डी व परिसरातील अवैध धंदे बंद होतील. गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट होईल असे जाणकार लोक बोलत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button